इचलकरंजीत उद्यापासून गुरुचरित्र पारायण सप्ताह

इचलकरंजीत उद्यापासून गुरुचरित्र पारायण सप्ताह

इचलकरंजीत उद्यापासून
गुरुचरित्र पारायण सप्ताह
इचलकरंजी ः अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ नदीवेस सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ अखंड नाम, जप, यज्ञ, श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह ३० एप्रिल ते ६ मेदरम्यान आहे. उद्या (ता.२९) ग्रामदेवता मानसन्मान, यज्ञभूमी पूर्वतयारी, मंगळवारी (ता.३०) मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, गुरुचरित्र वाचनास सुरुवात. बुधवारी (ता.१) नित्य स्वाहा:कार, श्री गणेश याग व श्री मनोबोध याग, गुरुवारी (ता.२) नित्यस्वाहा:कार, श्री स्वामी याग, शुक्रवारी (ता.३) नित्य स्वाहा:कार, श्री चंडी याग, शनिवारी (ता.४) नित्य स्वाहा:कार, श्री गीताई याग, रविवारी (ता.५) नित्य स्वाहा:कार, रुद्र याग, मल्हारी याग, बुधवारी (ता.६) बली पूर्णाहूती, सत्यदत्तपूजन व अखंड नाम जप यज्ञाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताह काळात विविध आध्यत्मिक सेवा करण्यात येणार आहेत. सामुदायिक गुरुचरित्र वाचन सकाळी भूपाळी आरतीनंतर सुरू होईल, अशी माहिती सेवा केंद्रातर्फे दिली.
---------------------

‘रेल्वेप्रश्नाबाबत
भूमिका जाहीर करा’
इचलकरंजी ः इचलकरंजी रेल्वेचा उमेदवारांना विसर पडल्याचे दिसून येत आहे. याबाबत उमेदवारांनी तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन इचलकरंजी रेल्वे कृती समितीने केले आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी इचलकरंजी-हातकणंगले या आठ किलोमीटरच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. याचे ऑनलाईन भूमिपूजनही झाले आहे. पण, कित्येक वर्ष हा प्रश्‍न रेंगाळत पडला आहे. वेळोवेळी लोकप्रतिनिधी, रेल्वे मंत्रालय, मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली गेली नाही. उमेदवारांनी भूमिका स्पष्ट केली नाही तर आपली भूमिका लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कृती समितीकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com