पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

विषारी द्रव पिल्याने तरुणाचा मृत्यू
कोल्हापूर ः विषारी द्रव पिल्याने प्रकृती चिंताजनक बनलेला सुहास भिकाजी पांढरे (वय ३५, रा. आसुर्ले, पन्हाळा) याचा मृत्यू झाला. शिंगणापूर येथे बहिणीच्या घरी हा प्रकार घडला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...
भिक्षुकांना मारहाणप्रकरणी
अज्ञातांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर, ता. १२ ः लहान मुले पळविल्याच्या गैरसमजातून दोघा भिक्षुकांना जमावाने मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी राजारामपुरी परिसरात घडला होता. समीर जोगी व साहील जोशी अशी जखमींची नावे आहेत. दोघांच्या मिरजेतील नातेवाइकांशी संपर्क करून त्यांची माहिती घेतली असता ते फिरून भिक्षा मागतात, असे समोर आले. गैरसमजातून अशी मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सहा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, भिक्षा मागणारे विशिष्ट जमातीचे असून, ते मुले पळविण्यासाठी आल्याची अफवा पसरविण्यात आली होती. तसेच याविषयीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. मात्र, यातून चुकीचे कृत्य घडण्याची शक्यता गृहीत पकडून पोलिसांनी या प्रकाराच्या मुळाशी जाऊन चौकशी करून पुढील कार्यवाही केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com