कोल्हापूरची सिंधुदुर्गवर पाच गडी राखून मात

कोल्हापूरची सिंधुदुर्गवर पाच गडी राखून मात

83706
परिणिता पाटील
..............
कोल्हापूरची सिंधुदुर्गवर पाच गडी राखून मात

एमसीए निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धा ः परिणीता पाटीलची भेदक गोलंदाजी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने निमंत्रित १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा महिला क्रिकेट संघाने सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघाचा तीन धावांनी पराभव केला.
शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजच्या मैदानावर आज कोल्हापूर व सिंधुदुर्ग संघांत सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना सिंधुदुर्ग संघाने २० षटके आणि एक चेंडूत सर्व बाद ५० धावा केल्या. यात स्नेहा पटेलने १६ धावा केल्या, तर कोल्हापूर संघाकडून परिणिता पाटीलने पाच धावांत पाच गडी बाद केले. मधुरा इंगवलेने तीन, तर अनन्या चव्हाणने दोन गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना कोल्हापूर संघाने १३ षटके आणि चार चेंडूंत ५ बाद ५३ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केला. यात तनिष्का माळीने २६, अनुष्का भुईंबरने नाबाद ६ धावा केल्या. सिंधुदुर्ग संघाकडून केवळ आर्या जाधवने दोन गडी बाद केले, तर अन्य तीन फलंदाज धावबाद झाले.
........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com