Maratha Reservation
Maratha ReservationSakal

'मराठा आरक्षण सर्व्हेक्षणा'चे 74 लाखांचे मानधन जमा; खासगी शिक्षक-शिक्षकेतर महासंघाचा पाठपुरावा

गेल्या दोन महिन्यांपासून या मानधनासाठी खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाने शासनाकडे पाठपुरावा केला.
Published on
Summary

या सर्वेक्षणाचे मानधन शिक्षकांना पूर्वी जाहीर केल्यानुसार मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना ४० ते ५० टक्के कमी मानधन मिळाले आहेत.

कोल्हापूर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) सर्वेक्षण करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षिका आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर आज मानधन जमा झाले. त्याची एकूण ७४ लाख ४५ हजार ६४४ रुपये इतकी आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी दिली आहे.

राज्यभरात २२ जानेवारी ते दोन फेब्रुवारीदरम्यान करण्यात आलेल्या मराठा समाजातील कुटुंबांचे आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेच्या शाळा, खासगी प्राथमिक शाळांमधील १२६० शिक्षक, मुख्याध्यापकांची प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांना मानधन व प्रवास भत्ता म्हणून दहा हजार पाचशे रुपये, तर प्रति मराठा कुटुंब सर्वेक्षणासाठी शंभर रुपये आणि इतर कुटुंबासाठी दहा रुपये याप्रमाणे हे मानधन देण्यात आले आहे. मानधन जमा होण्यासाठी महानगरपालिकेचे प्रशासक, अतिरिक्त आयुक्त यांच्यासह लेखाधिकारी सरनाईक, नंदकुमार चौगले, विक्रम लाड, आर. डी. जाधव, नेताजी फराकटे आदींचे सहकार्य लाभले.

Maratha Reservation
गुप्तधनासाठी घरात खड्डा खोदला, मांत्रिकाला बोलवलं अन् नरबळी..? कौलवमधील थरारक प्रकाराने पंचक्रोशी हादरली

गेल्या दोन महिन्यांपासून या मानधनासाठी खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाने शासनाकडे पाठपुरावा केला. या सर्वेक्षणाचे मानधन शिक्षकांना पूर्वी जाहीर केल्यानुसार मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना ४० ते ५० टक्के कमी मानधन मिळाले आहेत. याबाबतची तफावत दूर करून पूर्ण मानधन मिळावे, याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाकडे महासंघाने मागणी केली आहे. त्याची दखल राज्य शासनाने घेतली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याची इशारा कोरे यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.