अधिवेशनातून- सतेज पाटील

अधिवेशनातून- सतेज पाटील

Published on

अधिवेशनातून... लोगो
...

प्रधानमंत्री आवासच्या
लाभार्थ्यांना अनुदान द्या
आमदार सतेज पाटील यांची विधानपरिषदेत मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुमारे ७५ हजार लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्याने त्यांची घरे अपूर्ण अवस्थेत आहेत. पावसाळ्यात त्यांच्या घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना तत्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली.
‘अपूर्ण अवस्थेतील घरे पूर्ण होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान लाभार्थांना वितरित करण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही केली किंवा करण्यात येत आहे’, असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थांना अनुदान न मिळाल्याचा दावा अमान्य केला. जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंर्तगत १६ हजार ८६५ घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी १५ हजार १९४ घरकुले पूर्ण झाली असून एक हजार ६७१ घरकुले प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.