अधिवेशन- सतेज पाटील

अधिवेशन- सतेज पाटील

Published on

गट ‘क'' मधील पदांची भरती
लोकसेवा आयोगातर्फे करा

सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

कोल्हापूर, ता. १० : शासकीय सेवेतील गट ‘क'' वर्गाच्या पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राबविण्याबाबत सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करण्याचा निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या पदांच्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घ्याव्यात, अशी अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी केली. दरम्यान, याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले.
आमदार पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा विषय मांडला. सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करण्यासाठी २०२२ मध्ये निर्णय झाला. मात्र, ही प्रक्रिया खासगी कंपनीमार्फत सुरू आहे. शिक्षक, तलाठी, आरोग्य, आदी विविध परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी व गैरव्यवहारांच्या प्रकरणामुळे या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.