लाडकी बहिणसाठी कर्मचारी-

लाडकी बहिणसाठी कर्मचारी-

Published on

महापालिकेचे पथक
प्रत्येक प्रभागात नियुक्त

कोल्हापूर, ता. १० ः शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने चारही विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक प्रभागात चार कर्मचाऱ्यांचे एक पथक नियुक्त केले आहे. यासाठी ३२० कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. या पथकाद्वारे त्या प्रभागातील पात्र लाभार्थींचा शोध घेऊन त्यांचे अर्ज भरून घ्यायचे आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या नियंत्रण अधिकाऱ्यापासून सहनियंत्रण अधिकाऱ्यांवरही जबाबदारी दिली आहे. प्रत्येक प्रभागात महापालिकेचा एक कर्मचारी, एक आशा स्वयंसेविका, बचतगटाच्या एक प्रतिनिधी, एक अंगणवाडी सेविका अशा चारजणांचे पथक काम करणार आहे. त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात जायचे असून पात्र लाभार्थ्याचा शोध घ्यायचा आहे. तसेच त्यांचे अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरून घ्यायचे आहेत. त्यांनी ऑफलाईनद्वारे किती अर्ज आले व किती ऑनलाईन पोर्टलद्वारे भरले गेले याचा अहवाल महापालिकेत द्यायचा आहे. बचत गटातील पात्र महिलांचे अर्जही भरून घ्यायचे आदेश काढले आहेत.

चौकट
विभागीय कार्यालयनिहाय चित्र
कार्यालय*प्रभाग*कर्मचारी
गांधी मैदान*२१*८४
छत्रपती शिवाजी महाराज मार्केट*१८* ७२
राजारामपुरी*२१*८४ कर्मचाऱ्यांची
छत्रपती ताराराणी*२०*८०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.