जयप्रभामध्ये पुन्हा लाईट कॅमेरा ॲक्शन

जयप्रभामध्ये पुन्हा लाईट कॅमेरा ॲक्शन
Published on

16024

‘जयप्रभा‘मध्ये पुन्हा
‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन''

‘आई अंबाबाई‘ गीताचे होणार चित्रीकरण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ३ ः जयप्रभा स्टुडिओमध्ये आता पुन्हा ‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन'' चा आवाज घुमणार आहे. येथील दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशन, भालकर्स व्हिजनची निर्मित, संग्राम भालकर दिग्दर्शित ‘करवीरची आई आई अंबाबाई‘ या गीताचे चित्रीकरण येथे होणार आहे. दरम्यान, आज या गीताच्या संहितेचे पूजन येथे झाले. तब्बल सात वर्षानंतर यानिमित्ताने जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रीकरण होणार आहे.
ज्येष्ठ कलादिग्दर्शक सतीश बिडकर, ज्येष्ठ कॅमेरामन इम्तियाज बारगीर, निर्माते विजय शिंदे, वेशभूषाकार शाम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संहिता पूजनाचा कार्यक्रम झाला. निर्मिती व्यवस्थापक रणजीत जाधव, कलादिग्दर्शक अमर मोरे, कलाकार जितेंद्र कांबळे, कॅमेरामन सैफ बारगीर, राहुल जाधव, आकाश लिगाड़े, आशीष हेरवाडकर, बालकलाकार सुफीयान व सुहान बारगीर आदी उपस्थित होते. गीतकार मंदार पाटील यांनी गीताचे लेखन केले आहे. दर्शन सुतार यांचे संगीत असेल. संदीप भालकर, सपना जाधव- भालकर यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com