

डिझेल इंजिन निर्मितीमधील बाबाभाई
कोल्हापूरच्या डिझे इंजिननिर्मिती उद्योगातील ज्येष्ठ उद्योजक गजेंद्रभाई ठाकरसी ऊर्फ बाबाभाई वसा यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त...
ःःःःःःःःःःःःःःःः- अभिजित कुलकर्णी
-----------
ग्राहकाला केंद्रबिंदू मानून त्यांना नेमके काय हवे आहे, याचाच विचार करत नवनिर्मितीचा ध्यास घेणारे ज्येष्ठ उद्योजक म्हणून बाबाभाई वसा यांनी औद्योगिक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. ६४ वर्षे रॉकेट इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. नवनिर्मितीचा ध्यास, ग्राहकांच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न, विक्रीपश्चात उच्च सेवा, कामगार हाच व्यवसायाचा पाया समजून व्यवसायाची उभारणी, या चतुःसूत्रीवर उभारलेल्या रॉकेट इंजिनिअरिंगने डिझेल इंजिनच्या निर्मितीत जागतिक बाजारपेठेत मोहोर उमटवली आहे. आर ॲन्ड डी (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) ही उद्योजकांमध्ये संकल्पना राबविणाऱ्या डिझेल इंजिनच्या निर्मितीत अग्रेसर असणाऱ्या रॉकेट इंजिनिअरिंगच्या बाबाभाई वसा यांच्या उल्लेखाशिवाय कोल्हापूरच्या उद्योगाचा अध्याय पूर्ण होऊच शकत नाही.
वसा कुटुंबीय मूळचे गुजरातमधील जामनगरचे, बाबाभाई व हसमुखभाईंचे वडील ठाकरसीभाई यांचा पूर्वीपासून मुंबईत गुळाचा व्यापार होता. १९४१ च्या दरम्यान ठाकरसीभाई गूळ व्यापारानिमित्त कोल्हापुरात आले. ७० वर्षे वसा कुटुंबीयांची नाळ उद्योग व व्यवसायाद्वारे कोल्हापूरशी कायमची जोडली गेली. ६४ वर्षांपूर्वी कोल्हापुरात वसा कुटुंबीयांनी रॉकेट इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनची स्थापना केली. बाबाभाई व हसमुखभाई यांचे ज्येष्ठ बंधू (कै.) हेमूभाई वसा यांनी ५ ऑगस्ट १९६० ला रॉकेट इंजिनिअरिंगची स्थापना केली. साकोली कॉर्नर येथे छोट्याशा जागेत सुरू झालेला हा प्रवास दोन ते तीन महिन्यांतच कॉमेट इंजिनची निर्मिती करू लागला. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी डिझेल इंजिनचा ‘कॉमेट’ ब्रॅंड विकसित केला. त्याचा दबदबा आजही आहे.
१९९० मध्येच ९० व ९५ किलो वजनाची हलकी व कार्यक्षम इंजिने विकसित केली. त्यानंतर सुधारणा करत १५० किलो इंजिनचे वजन ५२ किलोपर्यंत कमी केले. २०१० मध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षांत ६० किलो वजनाचे ‘कॉमेट कोल्ट’ न ५४ किलो वजनाचे ‘कॉमेट कब’ ही इंजिने तयार करून पोर्टेबल इंजिनच्या क्षेत्रात नाव झळकाविले. या ब्रॅण्डचा बाजारात ६० टक्के हिस्सा आहे. भारतातच नव्हे, तर आफ्रिका, दक्षिणपूर्व आशिया तसेच मध्य पूर्वेकडील देशांमध्ये उत्पादन निर्यात करण्यात रॉकेट इंजिनिअरिंग अग्रेसर आहे. राज्याच्या कोणत्याही भागात रॉकेट इंजिनिअरिंगची पथके थेट ग्राहकाशी संवाद साधून सेवा देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.