

एनआयई फोटो- 56286
...........
56443
प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार
कोल्हापूर ः रस्त्यात सापडलेला महागडा स्मार्टफोन प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल रिक्षाचालक आनंदराव पाटील यांचा सत्कार झाला.
बी. टी. कॉलेज रिक्षा स्टॉप येथे एका दुचाकीवरून जाताना नवीनच खरेदी केलेला स्मार्टफोन खाली पडलेला श्री. पाटील यांना दिसला. त्यांनी तत्काळ त्या वाहनधारकाच्या मागे रिक्षाने जाऊन गाठण्याचा प्रयत्न केला. पण, वाहतूक कोंडीमुळे त्यांना गाठता आले नाही. अखेर स्मार्टफोनच्या पावतीवरून दुकानदाराच्या माध्यमातून या वाहनधारकांशी संपर्क साधला. ओळख पटवून बी. टी. कॉलेज रिक्षा स्टॉप येथे सर्व रिक्षाचालकांच्या उपस्थितीत हा स्मार्टफोन परत केला. यावेळी संभाजी रणदिवे, विलास परीट आदी रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.
हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे
शुक्रवारी मशाल मिरवणूक
कोल्हापूर : येथील हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता. १४) मशाल मिरवणूक होणार आहे. मिरजकर तिकटी येथून सायंकाळी सव्वासहा वाजता मिरवणुकीला प्रारंभ होईल, अशी माहिती संस्थापक अशोक देसाई यांनी दिली. मशालीचे प्रज्वलन अंध मुलांच्या हस्ते होईल. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, सुजित चव्हाण, राहुल चिकोडे, मुरलीधर जाधव यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ होईल.
--
‘अल्ट्राव्हायोलेट''चे
नवीन एक्स्पिरियन्स सेंटर
कोल्हापूर ः अल्ट्राव्हायोलेट कंपनीने येथे नवीन यूव्ही स्पेस स्टेशनच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. नवीन यूव्ही स्पेस स्टेशन ग्राहकांना ‘अल्ट्राव्हायोलेट’च्या उच्च-कार्यक्षमता असलेल्या एक्स-४७ क्रॉसओव्हर आणि एफ ७७ एस या मोटारसायकलींचा सर्वसमावेशक अनुभव देणार आहे. स्पेस स्टेशन हे थ्री एस सुविधाकेंद्र असून ग्राहकांना टेस्ट राईडपासून विक्री, सेवा, विविध मोटारसायकल ॲक्सेसरीज आणि मर्चेंडाइजपर्यंतचा अनुभव देण्यासाठी विकसित केले आहे. ‘अल्ट्राव्हायोलेट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सुब्रह्मण्यम यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर हे भारतातील महत्त्वाच्या ऑटो कॉम्पोनंट उत्पादन केंद्रांपैकी एक नावीन्यपूर्णतेचा आग्रह धरणारे शहर आहे. शाहू मार्केट यार्डसमोरील हॉटेल फर्न शेजारील स्टेशनला ग्राहकांनी भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.