

अंक पान १ वर लोगो घेणे
--
लोगो
हत्तींच्या दहशतीखाली
भाग- २
--
06004
चंदगड : येथे हत्तीकडून ऊस पिकांचे नुकसान नित्याचे झाले आहे.
--
जीवितहानी, पीक नुकसानीमुळे वाढला संघर्ष
मानवांसह हत्तींचाही मृत्यू ; भरपाई रकमेबाबत शेतकऱ्यांत नाराजी
---
सुनील कोंडुसकर/ रणजित कालेकर सकाळ वृत्तसेवा
चंदगड /आजरा, ता. ६ ः हत्तींचा महाराष्ट्रातील प्रवेश हा दहशतीनेच झाला. त्याने पहिला बळी चंदगड तालुक्यात शेतात काम करणाऱ्या महिलेचा घेतला. त्यापाठोपाठ जंगल हद्दीलगत जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका वृध्दाला सोंडेने आपटून ठार मारले. दरम्यान, पिकांच्या नुकसानीचे सत्र सुरूच होते. त्यामुळे स्थानिक जनतेसह शेतकऱ्यांत हत्तीबाबत दहशत तयार झाल्याने संघर्ष वाढला. मानवाबरोबर चंदगड तालुक्यातील जेलुगडे येथे विजेच्या धक्क्याने पाच हत्तींचा मृत्यू झाला. पाटणे येथे विहिरीत पडून मादी हत्तीचा मृत्यू झाला. हत्तीला समजून घेण्यात सुमारे दीड तपाचा कालावधी लागला. सध्या जीवितहानी नसली तरी पिकांसह कृषी साहित्य, मोटारी यांचे नुकसान सुरूच आहे. त्यामुळे हत्ती आणि मानवांतील संघर्ष तीव्र झाला आहे.
हत्तीकडून खाण्यापेक्षा तुडवून होणारे पिकांचे नुकसान मोठे आहे. सुगीमध्ये हत्ती पिकांत घुसून फडशा पाडतो. कष्टाने हाताशी आलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट होत असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. खते, बी-बियाणे, मशागतीवर झालेले खर्च याचा आर्थिक फटका बसतो. वनविभागाकडून नुकसानभरपाई दिली जाते, मात्र भरपाईची रकमेबाबत शेतकऱ्यांत नाराजी आहे. शासनाने बाजारभावाप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, अशी शेतकरी व विविध संघटनांची मागणी आहे. यासाठी कित्येक वर्ष पाठपुरावा सुरू आहे, मात्र शासनाकडून प्रतिसाद नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती कसण्याच्या मानसिकतेत बदल होत आहे. शेतीच नको अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सुरुवातीच्या काळात हत्तीकडून माणसांचे बळी गेले. त्यावेळी वनविभागाचे अधिकारी त्याला अपघात म्हणून बघत होते. मात्र, ज्यावेळी विजेच्या धक्क्याने हत्तींचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांनी हत्तीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत दोन कोटी असल्याचे सांगितले. या वक्तव्यामुळे जनतेत वनविभागाविषयी रोष तयार झाला. मानवांवरील हल्ले व पिकांची नुकसान यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चे काढले, आंदोलने केली. त्यातून काही हाती लागले नाही. हत्तीशी समन्वय साधून एका अर्थाने शेतकऱ्यानेच माघार घेतली आहे; मात्र नुकसानीचे सत्र पाहता शेती व्यवसाय टिकावा म्हणून शासनाने स्वतःहून सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे.
--
*दृष्टिक्षेपात
शासनाकडून दिली जाणारी भरपाई (प्रतिगुंठा)
*ऊस*१०५६
*भात*७८०
*नाचणा*५१०
*भुईमूग*८१६
*नारळ*९५०० (पाच वर्षांपेक्षा अधिक वर्षांचे झाड)
*सुपारी*५५०० (पाच वर्षांपेक्षा अधिक वर्षांचे झाड)
*केळी*२४०
*ज्वारी*३२५
*हरभरा*६००
---
चौकट
हत्तीमुळे अन्य वन्यप्राण्यांचे फावले
हत्ती प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीची रखवाली बंद केली आहे. एवढी हत्तीची दहशत आहे. त्यामुळे गवे, रानडुक्कर, सांबर यासह अन्य वन्यप्राणी पिकांवर ताव मारत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.