कोवाड - पिक स्पर्धा

कोवाड - पिक स्पर्धा

01024
ऊस पीक स्पर्धेत सोलापुरे व बेळगांवकर प्रथम
ओलम कारखान्यातर्फे आयोजन; एकरी उस उत्पादन वाढीसाठी चालना

कोवाड, ता. १५ ः राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याने ऊस पीक स्पर्धेतील १४२ प्रगतीशिल शेतकऱ्यांचा सन्मान केला. एकरी उस उत्पादनात वाढीसाठी स्पर्धा झाल्या. स्पर्धेत ऊस लागणीत गडहिंग्लजच्या अन्नपूर्णा प्रदीप सोलापुरे यांनी ४४ गुंठ्यांत १०२ टन तर खोडव्यात बिजगर्णी (ता. बेळगांव) येथील भरमाना पिराजी बेऴगांवकर यांनी २० गुंठ्यांत ३८ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतल्याने त्यांचा विशेष गौरव झाला. स्पर्धेत विजेत्यांचा बिझनेस हेड भरत कुंडल, शेती अधिकारी सुधीर पाटील व ऊसविकास अधिकारी रणजित सरदेसाई यांच्या हस्ते सत्कार झाला.
खोडवा व लागण क्षेत्रानुसार जमिनीची प्रत व हवामानाचा अंदाज विचारात घेऊन विभागवार स्पर्धा भरविली होती. १४२ शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. निकाल असा, गडहिंग्लज विभाग-(गडहिंग्लज, नेसरी व हलकर्णी) ः खोडवा- विठ्ठल बाबूराव निंबाळकर (प्रथम), विजय महादेव आरभावी (व्दितीय), धैर्यशील अशोक जाधव (तृतीय), लागण- अन्नपूर्णा प्रदीप सोलापुरे (प्रथम), बसप्पा बाळाप्पा कुरणे (व्दितीय), सुनीलकुमार चंद्राप्पा व्हंजी (तृतीय), पाटणे फाटा विभाग- (अडकूर, पाटणे फाटा, शिनोळी) ः खोडवा - भरमान्ना पिराजी बेळगांवकर (प्रथम), गोपाळ पिराजी बेळगांवकर (व्दितीय), देवाप्पा ठाणू पाटील (तृतीय), लागण-सुबराव गुंडोपंत हारकारे (प्रथम), उत्तम तुकाराम मुरकुटे (व्दितीय), रवींद्र रमेश देशपांडे (तृतीय), कोवाड विभाग- (राजगोळी, कुदनूर, कोवाड व ढोलगरवाडी) ः खोडवा-विजय प्रकाश पाटील (प्रथम), दयानंद जोतिबा जाधव (व्दितीय), जोतीबा सिध्दू जाधव (तृतीय). लागण-दीपक शंकर पाटील (प्रथम), शीतल रामचंद्र पाटील (व्दितीय), अरुण नारायण तेऊरवाडकर (तृतीय). स्पर्धा पार पाडण्यासाठी शेती अधिकारी सुधीर पाटील, ऊसविकास अधिकारी रणजित सरदेसाई, झोनल व्यवस्थापक नामदेव पाटील, भागोजी लांडेंसह शेती कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
-------------------------------------
चौकट
स्पर्धेसाठी ३१ पर्यंत नावनोंदणी
चालू वर्षी पुन्हा ही स्पर्धा भरविली जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. त्यांनी ३१ मार्च पर्यंत शेती कार्यालयातून नांव नोंद करावी,असे आवाहन शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com