

KOW24B02342
जवान नाना पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार
कोवाड, ता. २४ ः मलतवाडी (ता. चंदगड) येथील सैन्यदलातील हवालदार नाना वाकोजी पाटील (वय ४३) यांचा बेळगांव येथील हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने मृत्यू झाला. मृत्यूची बातमी समजताच मलतवाडी गावावर शोककळा पसरली. रविवारी दुपारी दोन वाजता मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या खास वाहनातून तिरंग्यात लपेटलेले नानाचे पार्थिव गावात आणले. दरम्यान गावागावातून नागरिकानी नानाला मानवंदना दिली. पार्थिवाचे दर्शन झाल्यानंतर ग्रामस्थानी सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये पार्थिव ठेवून अंत्ययात्रेला सुरवात झाली. मुलगा रुद्र याने पार्थिवाला भडाग्नी दिली. सिग्नल रेजिमेंटलमध्ये तो हवालदार पदावर होते. २२ वर्षाची सेवा झाल्याने येत्या फेब्रुवारी महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन बहिनी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.