जुना बुधवारचा पीटीएम वर विजय

जुना बुधवारचा पीटीएम वर विजय

श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग
-
79302
-

जुना बुधवारचा ‘पीटीएम’वर विजय 
ऋणमुक्तेश्वर तालीमविरुद्ध रंकाळा तालीम सामना १-१ बरोबरीत

कोल्हापूर, ता. ३ : श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळावर संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम संघाने दिमाखदार विजय मिळवला, तर ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळविरुद्ध रंकाळा तालीम मंडळ यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे. 

पाटाकडील तालीम मंडळविरुद्ध जुना बुधवार पेठ यांच्यातील सामना रंगतदार ठरला. सामन्यात बुधवार पेठ संघाने २-१ ने विजय मिळवला. पीटीएमने सुरुवातीपासूनच पकड मजबूत ठेवली. पीटीएमने बुधवारपेठ संघाची बचावफळी भेदत गोल नोंदवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी मिळालेल्या पेनल्टीवर पीटीएमच्या अक्षय मेथे-पाटीलने २१ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामना १-० असा केला. उत्तरार्धात गोल फरक वाढविण्याच्या उद्देशाने पीटीएमने अधिक चाली रचल्या. जुनाबुधवारकडून जोरदार बचाव सुरुरू होता. यातच मध्येच होणारे आक्रमण पीटीएम संघाची लय बिघडवायला कारणीभूत ठरले. सामन्याच्या ७८ व्या मिनिटाला जुना बुधवार संघाला पेनल्टी मिळाली. त्याचा फायदा उचलत रिचमॉन अवेटीने गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ सामन्याच्या ८० व्या मिनिटाला जुना बुधवारच्या अभिषेक भोपळेने मारलेला उत्कृष्ट फटका गोल जाळीत विसावला. यामुळे जुना बुधवार संघाने अखेरच्या क्षणात सामना जिंकला.  
ऋणमुक्तेश्वरविरुद्ध रंकाळा तालीम यांच्यातील सामना एक-एक गोल बरोबरीत राहिला. रंकाळाकडून ३७ व्या मिनिटाला विकास जाधवने गोल करत संघाला १-० गोलने आघाडी मिळवून दिली. ऋणमुक्तेश्वरकडून गोलच्या परतफेडसाठी प्रयत्न झाले. सामन्याच्या ७९ व्या मिनिटाला सिद्धेश मोगणे याने गोल केला. संपूर्ण वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिला.

चौकट
आजचे सामने 
दुपारी २ वाजता : झुंजार क्लबविरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ  
सायंकाळी ४ वाजता : बालगोपाल तालीममंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com