
पॅकर्स क्लब क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
पॅकर्स क्लबतर्फे बुधवारपासून
निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा
कोल्हापूर, ता. २४ : पॅकर्स क्लबतर्फे १ मार्चपासून निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी राज्यभरातील आठ संघांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती सुधीर पारखे, रमेश हजारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. २५ वर्षांखालील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ ते ५ मार्चदरम्यान शास्त्रीनगर मैदान व इचलकरंजी येथील मैदानावर होतील. स्पर्धेच्या निमित्ताने उत्कृष्ट खेळ क्रिकेट शौकिनांना अनुभवता येणार आहे. स्पर्धेचे चषक अनावरण २८ ला माजी कसोटी खेळाडू करसन घावरी व महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी ते नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करतील. विजेत्यांना एक लाख, तर उपविजेत्यांना ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस व फिरते चषक देण्यात येणार असून, अनेक वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. अंकुश निपाणीकर, नंदकुमार बामणे, गुरुदत्त मुंगेरवाडे उपस्थित होते.