महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 
जिल्हा महिला संघाचा विजय

महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जिल्हा महिला संघाचा विजय

महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये
जिल्हा महिला संघाचा विजय
कोल्हापूर, ता. २८ : निमंत्रितांच्या वरिष्ठ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा महिला संघाने नंदूरबार जिल्हा संघावर ३९८ धावांनी विजय मिळवला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे औरंगाबाद येथे स्पर्धा सुरू आहे.
प्रथम फलदांजी करताना कोल्हापूर जिल्हा महिला संघाने ५० षटकांत ४ गडी गमावून ४९३ धावा फटकाविल्या. आदिती गायकवाडने १४६, ऋतुजा देशमुख १४५, सौम्यलता बिराजदार ७४ व अनुजा पाटील ६९ धावा केल्या. नंदुरबारकडून अस्मिता खैरनारने तीन व साक्षी शुक्लाने प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल खेळताना नंदुरबारला ३७ षटकांत सर्वबाद ९५ धावा करता आल्या. स्वाती अहीर ३९, श्रॄतीका अलगुडे १८, दिया मराठेने १३ धावा केल्या. कोल्हापूरकडून ज्ञानेश्वरी पाटील, अनुजा पाटील यांनी प्रत्येकी दोन, अभिलाषा पाटील, संजना वाघमोडे, आरती जाधव, आदिती गायकवाड व सौम्यलता बिराजदार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com