कुरुंदवाडला संभाजी महाराजांना अभिवादन

कुरुंदवाडला संभाजी महाराजांना अभिवादन

03496
कुरुंदवाड ः पालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आशिष चौहान, पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.
--------------
कुरुंदवाडला संभाजी महाराजांना अभिवादन
कुरुंदवाड, ता. १४ ः शहर व परिसरात विविध सामाजिक संस्था व मंडळांतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली.

कुरुंदवाड पालिका
येथील पालिकेत प्रतिमेला प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पाणीपुरवठा अभियंता प्रदीप बोरगे, बांधकाम अभियंता योगेश गुरव, पालिका कर्मचारी संघटनेचे नंदकुमार चौधरी आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज चौक
छत्रपती संभाजी महाराज चौकात प्रतिमेला वैभव उगळे, सागर जाधव यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वैशाली जुगळे, ओमकार बाबर, सुनील जुगळे उपस्थित होते.

उदय मंडळ
येथील उदय मंडळ पाटील गल्ली संयुक्त मंडळातर्फे प्रतिमेला एस. के. पाटील महाविद्यालयाचे सचिव अजित देसाई, माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. धनंजय पाटील, सुरज पाटील, धीरज पाटील आदी उपस्थित होते.

मराठा मंडळ
येथील मराठा मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रतिमेला शिवाजी रोडे, मराठा फौडेशन येथे दयानंद तथा नंदकुमार नाईक, सतीश भंडारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर, नंदकुमार पाटील, अर्जुन पाटील, आनंदा शिंदे आदी उपस्थित होते.

गणपती मंदीर
येथील गणपती मंदिर येथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवध्वजाचे मान्यवरांच्याहस्ते पूजन केले. प्रतिमा पूजनानंतर ध्येयमंत्र व प्रेरणामंत्राचे सामूहिक पठण केले. गौतम पाटील, नितीश आंबी, अमृत चोपडे आदी उपस्थित होते. सकल मराठा मंडळ कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला बी. बी. सूर्यवंशी, प्रा. बी. वाय. चव्हाण यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गोपाळ चव्हाण, विजय मोगणे आदी उपस्थित होते.
-------
शिरोळ परिसर
शिरोळ ः येथील छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची मुख्य मार्गावरून मिरवणूक काढली. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण केला. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्याहस्ते मूर्तीचे पूजन केले. माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य अशोकराव माने, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बी. जी. माने, माजी सरपंच गजानन संकपाळ, नगरसेवक डॉ. अरविंद माने, श्रीवर्धन माने देशमुख आदींच्या उपस्थितीत अभिवादन केले. यानिमित्त विविध कार्यक्रम झाले. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचतर्फे शिवकालीन प्राचीन युद्ध कला व मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके दाखवली. छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे दिग्विजय माने, नेताजी संकपाळ, विकी शिंदे, विनू रननवरे आदी उपस्थित होते.
--------
इचलकरंजी महापालिका
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये जयंतीनिमित्त सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस कार्यकारी अभियंता संजय बागडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव शिंदे, भारत कोपार्डे, सुरक्षारक्षक अनिल गावडे, सचिन शेडबाळे, सचिन व्हलेर, राजू जांभळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com