कुरुंदवाडला उद्या दुसरी पूर परिषद

कुरुंदवाडला उद्या दुसरी पूर परिषद

कुरुंदवाडला उद्या दुसरी पूर परिषद
धनाजी चुडमुंगे; वडनेरे समितीचे सदस्य प्रदीप पुरंदरे मार्गदर्शन करणार
कुरुंदवाड, ता. ३० ः येथील कृष्णा घाटावर गुरुवारी (ता.१) दुसरी पूर परिषद आयोजित केली आहे. पूर-परिषदेत २०१९ च्या महापुराचे कारण शोधण्यासाठी नेमलेल्या वडनेरे समितीतील सदस्य प्रदीप पुरंदरे हे प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान एक जून रोजी होणाऱ्या पूर परिषदेच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून जागृती मोहीम यात्रा राबवण्यात येत आहे. पूरपरिषद यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. श्री. चुडमुंगे म्हणाले,‘२००५ चा महापूर येण्यापूर्वी कृष्णा पंचगंगा नदीचे पाणी काही प्रमाणात नदीपात्रा बाहेर येऊन दोन दिवसातच पुन्हा ओसरत होते. मात्र अलमट्टी धरणात ५१९ मीटर उंचीने पाणी साठवण्यास सुरुवात झाल्यानंतर पूरपरिस्थितीला सुरवात झाली. दहा ते पंधरा दिवस पाणी तुंबून राहून महापूर लवकर ओसरत नाही. २००५ च्या महापुरानंतर सतरा वर्षात राज्य सरकारने याबाबत कोणत्याही उपाययोजना राबवल्या नाहीत. देशात मानवी प्रयत्नाने व तंत्रज्ञानाद्वारे अनेक आपत्तीवर मात केली आहे. पण या महापूर आपत्तीवर शासन उत्तर शोधत नाही त्यामुळे अलमट्टी-हिप्परगी धरणे जबाबदार आहेत किंवा नदी पात्रात झालेले अडथळे कारणीभूत आहेत का? हे शोधल्याशिवाय येथील पूर गंभीरता कमी होणार नाही हे ओळखूनच शासनाला ही पूर गंभीरता लक्षात आणून देण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. त्यांच्याकडून सुचवलेले उपाय काय आहेत हे समजून घेऊन ते करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा रोडमॅप या पूर परिषदेत ठरवला जाणार आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com