अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

sakal_logo
By

03528
कुरुंदवाड ः येथील पालिका चौकात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
-----------
अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
कुरुंदवाड, ता. १ ः अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शहरात विविध उपक्रमांनी साजरी केली. कुरुंदवाड पालिका, भगतसिंग चौक, अहिल्यादेवी होळकर नगर, शिवतीर्थ, समस्त धनगर समाज आणि पालिका चौक येथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ढोल स्पर्धा, वृक्षारोपण, गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यासह आदी सामाजिक उपक्रम राबवले.
पालिका चौकात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला वैभव उगळे, बाबासाहेब सावगावे, पालिकेत मुख्याधिकारी आशिष चौहान, भगतसिंग चौकात आप्पासाहेब बंडगर, दीपक गायकवाड, दिलीप बंडगर, अजित देसाई, होळकरनगर येथे उदय डांगे, तानाजी आलासे, शिवतीर्थ येथे चंद्रकांत जोग, महादेव बागलकोटे तर भैरववाडी येथे सचिन मोहिते, किरण गावडे, दयावान तालीम येथे रामदास मधाळे, अलका मधाळे, मराठा मंडळ मध्यवर्ती कार्यालयात सचिन मोहिते, रवी गायकवाड, सकल मराठा मंडळ येथे बी. बी. सूर्यवंशी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.