गुडाळेश्वर पतसंस्थेला ८३ लाखांहून अधिक निव्वळ नफा : ए.डी.पाटील यांची माहिती

गुडाळेश्वर पतसंस्थेला ८३ लाखांहून अधिक निव्वळ नफा : ए.डी.पाटील यांची माहिती

गुडाळेश्वर पतसंस्थेला दीड कोटींवर ढोबळ नफा
कसबा तारळे, ता. ४ : गुडाळ (ता. राधानगरी) येथील श्री गुडाळेश्वर पतसंस्थेला एक कोटी ६२ लाखांचा ढोबळ नफा झाला. सर्व तरतुदी केल्यानंतर ८३ लाख ५८ हजार निव्वळ नफा झाल्याची माहिती गुडाळेश्वर समूहाचे संस्थापक व भोगावती साखर कारखान्याचे संचालक ए. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘संचालक व कर्मचाऱ्यांच्या पारदर्शक कारभाराच्या बळावर आर्थिक वर्षात १०० कोटींचा व्यवसाय केला. संस्थेकडे पावणेचार कोटींचे भागभांडवल असून साडेतीन कोटींचा राखीव व अन्य निधी आहे. ६२ कोटींच्या ठेवी असून साडेअडतीस कोटींचे कर्ज वितरित केले आहे. सव्वा एकतीस कोटींचा सुरक्षित गुंतवणूक केली असून १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम राखण्याचा निर्णय घेतला.’
पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले, ‘संस्थेची ३०० कोटींची वार्षिक उलाढाल झाली असून मुख्य कार्यालयासह भोगावती व कूर दोन्ही शाखा नफ्यात आहेत. संस्थेच्या प्रगतीसाठी आवश्यक बाबींमध्ये किमान १३ ते ३२ टक्क्यांपर्यंत वाढ मिळवली असून सभासदांचा विश्वास संपादन करणाऱ्या संस्थेने प्रतिकर्मचारी साडेपाच कोटी रुपयांचा व्यवसाय केला.’
यावेळी माजी अध्यक्ष अनंत तेली, उपाध्यक्ष ईश्वरा पाटील, डॉ. ए. बी. माळवी, व्यवस्थापक डी. जी. पाटील, भोगावती शाखा व्यवस्थापक विठ्ठल पाटील व कूर शाखा व्यवस्थापक प्रवीण माळवींसह संचालक एकनाथ पवार, दत्तात्रय पाटील, बंडोपंत जाधव, दत्ता पोवार, चंद्रकांत डोंगळे व कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com