कसबा तारळेत डेंग्यूचे रुग्ण

कसबा तारळेत डेंग्यूचे रुग्ण

कसबा तारळेत डेंग्यूचे रुग्ण
१९ पैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह
कसबा तारळे, ता. १७ : येथे गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी आरोग्य यंत्रणेने येथील १९ रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथे डेंग्यूचे रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने आता हा विषय गांभीर्याने हाताळण्याची व डेंग्यूचे समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे. येथे अनेक घरांमध्ये डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षणे असलेले रुग्ण आहेत. एका एका कुटुंबामध्ये अपवाद वगळता अख्खे कुटुंबच आजारी असल्याची स्थिती आहे. बहुतांशी रुग्णांनी राधानगरी ग्रामीण रुग्णालय आणि स्थानिक तसेच बाहेरील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत. काही रुग्ण आजही उपचार घेत आहेत. खासगी उपचारांचा खर्च आवाक्यपलीकडचा असल्याने रुग्णांना आर्थिक भारही सोसावा लागत आहे.
कसबा तारळे येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत निर्लेखित केली गेल्याने तसेच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने पूर्ण क्षमतेने येथे शासकीय आरोग्य सेवा मिळत नाही. घरोघरी रुग्ण असूनही पाणी साठवण्याची पद्धत व फ्रिज आणि कुलरच्या कंटेनरमध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ शकते याबाबतचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
---------------
कोट
साथीच्या रोगांचा संसर्ग होऊ नये यासाठी ग्रामपंचायततर्फे गल्लोगल्ली गटारांची साफसफाई करण्याबरोबरच यंत्राच्या सहाय्याने धूर फवारणी सुरू आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी पाणीसाठ्यांची तपासणी व प्रबोधन केले जात आहे. जिल्हा शासकीय आरोग्य यंत्रणेने येथे तातडीने प्रबोधन, तपासण्या व उपचार करून रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याची आमची मागणी आहे.
- विमल पाटील, सरपंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com