पन्हाळ्यातील पीएम किसान चे लाभार्थी अडकले ई-केवायसीत

पन्हाळ्यातील पीएम किसान चे लाभार्थी अडकले ई-केवायसीत

Published on

पन्हाळ्यातील ‘पीएम किसान’चे
लाभार्थी अडकले ई-केवायसीत

कोतोली, ता. ६ ः पन्हाळा तालुक्यात कृषी विभागातर्फे ई- केवायसी व बँक खात्याला आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी करून आधार सीडिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वारंवार संपर्क करूनही ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी संलग्न करण्यास दिरंगाई करणाऱ्या लाभार्थ्यांची शासन दप्तरी नोंद घेऊन पीएम किसान पोर्टलवर अपात्र मार्क केले जाणार आहे. त्यांना या योजनेतून कमी केले जाईल. पात्र शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्रांवर जाऊन अथवा आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असल्यास स्वतःच्या मोबाईलवरून ई-केवायसी करून घ्यावी. ज्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही, अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आधार कार्ड बँक खात्यास लिंक करावे, अथवा पोस्टात नवीन खाते उघडण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. नोंदणीकृत लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळणार आहे. सद्यःस्थितीत ई-केवायसी व बँक खाती करताना क्षेत्रीय स्तरावर अडचणी निर्माण होत आहेत. कृषी सहायक व कृषी सेवक अशा लाभार्थ्यांना प्रत्यक्ष संपर्क करत आधार लिंक व ई-केवायसी करण्याच्या सूचना करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.