संघर्ष हा स्व. मंडलिकांचा मुलभूत विचा : डॉ. जयसिंगराव पवार हमिदवाडा कारखान्यावर ८ वा स्मृतिदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संघर्ष हा स्व. मंडलिकांचा मुलभूत विचा : डॉ. जयसिंगराव पवार  हमिदवाडा कारखान्यावर ८ वा स्मृतिदिन
संघर्ष हा स्व. मंडलिकांचा मुलभूत विचा : डॉ. जयसिंगराव पवार हमिदवाडा कारखान्यावर ८ वा स्मृतिदिन

संघर्ष हा स्व. मंडलिकांचा मुलभूत विचा : डॉ. जयसिंगराव पवार हमिदवाडा कारखान्यावर ८ वा स्मृतिदिन

sakal_logo
By

04291
संघर्ष स्व. मंडलिकांचा मूलभूत विचार
: डॉ. जयसिंगराव पवार; हमिदवाड्यात ८ वा स्मृतिदिन

म्हाकवे, ता. १० : संघर्ष मंडलिकांचा मूलभूत विचार राहिला. त्यांनी न्यायासाठी संघर्ष केला. त्यांनी भगीरथाप्रमाणे दूधगंगेचे पाणी वेदगंगेत आणले. राजर्षी शाहू महाराज दूरदृष्टी असणारे लोकराजा होते. त्यांचाच वारसा चालवणारे सदाशिवराव मंडलिक लोकनेते होते, असे गौरवोद्गार इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी काढले.
हमिदवाडा (ता. कागल) येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचा आठव्या स्मृतिदिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावर कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार प्रा. संजय मंडलिक होते.
डॉ. पवार म्हणाले, ‘शेतकऱ्याला पाणी तर मुलांना शिक्षण मिळण्यासाठी मंडलिकांनी आयुष्यभर काम केले. लोकशक्ती पाठीशी असेल तर तुम्ही फेल जात नाही हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मंडलिकांनी दाखवले.’
खासदार संजय मंडलिक यांनी, स्व. मंडलिकांनी राजकारणापलीकडे जात प्रबोधनाच्या क्षेत्रात काम केले. राजर्षी शाहूंना भारतरत्न द्यावे या मागणीचा पुनरुच्चार केला. डिस्टिलरी प्रकल्पाच्या उद्घाटनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याची माहिती दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी महापौर मारूतराव कातवरे यांच्यासह मान्यवरांनी स्व सदाशिवराव मंडलिक यांना अभिवादन केले. कार्यक्रमास उपाध्यक्ष बापूसो भोसले- पाटील, ॲड. विरेंद्र मंडलिक, आर. डी. पाटील, बंडोपंत चौगले , राजेखान जमादार, अतुल जोशी, डॉ . जयंत कळके, अच्युत माने , विश्वास कुराडे, विजय भोसले, सुधीर पाटोळे उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख प्राचार्य डॉ. अर्जून कुंभार यांनी करून दिली. स्वागत कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी तर प्रास्ताविक अनिल घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश चौगले यांनी केले. राष्ट्रगीताने सांगता झाली.