साके येथील भैरवनाथ दुध संस्थेच्या लेखापरीक्षणाचे आदेश  तेरा वर्षाचे लेखापरीक्षण: लेखापरीक्षक म्हणून राजेश हंकारे यांची नियुक्ती

साके येथील भैरवनाथ दुध संस्थेच्या लेखापरीक्षणाचे आदेश तेरा वर्षाचे लेखापरीक्षण: लेखापरीक्षक म्हणून राजेश हंकारे यांची नियुक्ती

साके येथील भैरवनाथ दूध
संस्थेच्या लेखापरीक्षणाचे आदेश

म्हाकवे : साके (ता.कागल) येथील श्री भैरवनाथ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या लेखापरीक्षणाचे आदेश लेखापरीक्षा मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबईचे विशेष कार्यकारी अधिकारी रा.स. शिर्के यांनी दिले. त्यांनी वैधानिक लेखापरीक्षक म्हणून राजेश जयसिंग हंकारे यांची नियुक्ती केली आहे.
१ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०२२ या तेरा वर्षामचे लेखापरीक्षण होणार आहे. काही दिवसांपूर्वी संस्थेवर व्ही.एस. वाडीकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष बाळासो पाटील, उपाध्यक्ष सुनिता नामदेव पाटील, संचालक आंबुबाई घराळ, चंदर काळू निऊंगरे यांनी जिल्हा सहायक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीमध्ये संस्थेचे सचिव व अन्य संचालक बोगस सह्या करून गैरव्यवहार करीत आहेत. या तक्रारीची सहकारी संस्था दुग्ध कोल्हापूरचे सहाय्यक निंबधक डॅा.गजेंद्र देशमुख यांनी शहानिशा करून लेखापरीक्षक व्ही.एस. वाडीकर यांची संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली. चेअरमन, व्हा. चेअरमन व अन्य दोन संचालक यांनी संस्थेत परस्पर गैरव्यवहार होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सहाय्यक निंबधकाकडे २३ मार्च २०२३ रोजी तक्रार केली. या तक्रार अर्जानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व दोन संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या तक्रार अर्जाबाबत संस्थेच्या सचिवांना संस्थेचा लेखी खुलासा करण्याचे सहाय्यक निंबधकांनी कळविले. परंतु संस्थेने लेखी खुलासा कळविला नाही. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर सहाय्यक निबंधकांनी या संस्थेच्या दुध उत्पादकांचे हित लक्षात घेवून संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळावर कारवाई केली. त्यानुसार संस्थेवर सहा महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती केली. आता लेखापरीक्षण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com