क्षयरोगावरती सरकारी रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध :

क्षयरोगावरती सरकारी रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध :

क्षयरोगावर सरकारी रुग्णालयात
मोफत उपचार ः डॉ. जाधव

माजगाव ता. २५ ः क्षयरोग संसर्गजन्य आणि दुर्धर आजार आहे. सरकारी रुग्णालयांत यावर मोफत उपचार होतात. पूर्ण उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो, अशी माहिती उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत जाधव यांनी निवडे (ता. पन्हाळा) येथे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिली.
जगभरात २४ मार्च दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा होतो. याच दिवसाचे औचित्य साधून उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत जाधव यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोगाची लक्षणे, बचावात्मक उपाय, उपचारावर मार्गदर्शन केले.
सलग दोन आठवड्यांपासून खोकला, भूक मंदावणे, रात्रीचा ताप भरणे, घाम येणे, मानेवर गाठी आदी क्षयरोगाची लक्षणे असून, रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारा सकस आहार घेणे, गर्दीत न जाणे, मास्कचा वापर, व्यायाम यामुळे क्षयरोगापासून बचाव होऊ शकतो. क्षयरोग पूर्णपणे बरा होणारा आजार असून सरकारी रुग्णालयात मोफत तपासणी आणि उपचारांची सोय असल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली. यावेळी मुख्याध्यापक सुनील लाड, संदीप गाडगीळ, कृष्णात सुतार, दिलीप पोवार, सर्जेराव गोसावी तसेच आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडीसेविका उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com