कुस्ती स्पर्धेत सहा सुवर्णपदके,एक रौप्यपदक. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुस्ती स्पर्धेत सहा सुवर्णपदके,एक रौप्यपदक.
कुस्ती स्पर्धेत सहा सुवर्णपदके,एक रौप्यपदक.

कुस्ती स्पर्धेत सहा सुवर्णपदके,एक रौप्यपदक.

sakal_logo
By

03461
मुरगूडला रौप्यपदकासह सहा सुवर्णपदके
राज्यस्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा; महिलांची लक्षणीय कामगिरी

मुरगूड, ता. १६ : खोपोली (रायगड) येथील स्पर्धेत लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (साई) कुस्ती संकुल व डॉर्फ केटल ग्रुपच्या दत्तक महिला कुस्तीगीरांनी पाच सुवर्णपदके व एका रौप्यपदकाची कमाई केली.
मुलींच्या १४ वर्षाखालील ४६ किलो गटात अंजली वेताळने अंतिम फेरीत पुण्याच्या कोमल अवसरेवर एकतर्फी विजय मिळवत सुवर्णपदक मिळविले. ती विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलमध्ये आठवीत शिकते.
१७ वर्षाखालील ४३ किलो गटात प्रतीक्षा सावंत हिने अंतिम फेरीत पुण्याच्या अनुष्का हासबेला १३-०४ मात देत सुवर्णपदक मिळविले. ती विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावीत शिकते.
४६ किलो गटात गौरी पाटीलने अंतिम फेरीत पुण्याच्या आकांक्षा गुरवला मोळी डावावर चितपट करुन सुवर्णपदक मिळविले. ती विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावीत शिकते. ५३ किलो गटात तन्वी मगदूम हिने उपांत्य लढतीत औरंगाबादच्या वैष्णवी नखातेवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत पुण्याच्या आर्या बाणेकरला मोळी डावावर १०-०० चितपट करत सुवर्णपदक मिळविले. तन्वी विद्यालय (ज्युनि. कॉलेज) व्होकेशनल विभागात अकरावीत शिकते. ६५ किलो गटात शिवानी मेटकर हिने पुण्याच्या रोशनीला व लातूर विभागाच्या पौर्णिमा खरमाटे हिला पराभूत करून अंतिम फेरीत औरंगाबादच्या तृप्तीला ढाक डावावर चितपट करत सुवर्णपदक मिळविले. शिवानी शिवराज विद्यालय (ज्युनि.कॉलेज) व्होकेशनल विभागात अकरावीत शिकते. ६९ किलो गटात
भार्गवी सटालेने रौप्यपदक मिळवले. अंतिम फेरीत पुण्याच्या सानिया मुलाणीने १ गुणाने हरविले. ती विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलमध्ये नववीत शिकते. त्यांना वस्ताद दादा लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.