मुरगूड महारोजगार मेळावा.

मुरगूड महारोजगार मेळावा.

03600
तरुणांनी नोकऱ्या
देणारे उद्योजक बनावे

खासदार मंडलिक; मुरगूडला महारोजगार मेळाव्यास प्रतिसाद

मुरगूड, ता. १८ : परदेशातील संभाव्य नोकन्या हेरून त्याचे प्रशिक्षण भारतातील काही राज्ये देत आहेत.उद्योगासाठी बँका, फायनान्स कंपन्या नेहमीच मदतीचा हात पुढे करतात. त्याचा लाभ उठवत तरुणांनी नोकऱ्या देणारे उद्योजक बनावे; असे आवाहन खासदार संजय मंडलिक यांनी केले.
येथील जयशिवराय एज्युकेशन सोसायटी, शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या सयुक्त विद्यामाने आयोजित महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले. आमदार राजेश पाटील अध्यक्षस्थानी होते. ॲड. वीरेंद्र मंडलिक, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, संतोष पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार राजेश पाटील म्हणाले, कै. सदाशिवराव मंडलिक यांनी ग्रामीण भागासाठी विशेषतः मुलींच्या शिक्षणाची सोय करुन दिली.आता खासदार संजय मंडलिक सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या व रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत आहेत.’
जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संगीता खंदारे यांनी स्वागत, माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, जयवंत पाटील, सुहास खराडे, संभाजी आंगज, नंदू पाटील, अमर सणगर, आण्णासो थोरवत यांच्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड विभागातील सामाजिक कार्यकर्ते, तसेच आजी-माजी नगरसेवक, मुख्याध्यापक शिक्षक; पालक व सुशिक्षित बेरोजगार उपस्थित होते.
......
चौकट
रोजगार मेळावा घेणार दरवर्षी
आजच्या महा रोजगार मेळाव्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता जिल्ह्यातील अन्य तालुक्यात देखील असे रोजगार मेळावे भरवावे लागतील.असे खासदार मंडलिक यांनी सांगितले.तर खासदार संजय मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल असे राजेखान जमादार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com