सावतवाडी शाळेत गुणवंतांचा सत्कार

सावतवाडी शाळेत गुणवंतांचा सत्कार

02225
सावतवाडी तर्फ नेसरी : विद्या मंदिर शाळेत साधना कुंभार यांच्या सत्कारप्रसंगी धोंडीबा नांदवडेकर अजित नांदवडेकर, गीता नांदवडेकर, पुजा सासुलकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
------------
सावतवाडी शाळेत गुणवंतांचा सत्कार
नेसरी : सावतवाडी तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील विद्यामंदीर शाळेत वर्षभरात विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेले गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार केला. सरपंच धोंडिबा नांदवडेकर, उपसरपंच अजित नांदवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध स्पर्धा परीक्षा, तालुका व जिल्हा पातळीवर यश संपादन केलेल्या १७ विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षिका साधना कुंभार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. साधना कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पोलिस पाटील गीता नांदवडेकर, पूजा सासुलकर, रामदास ढगे, अमित फडके, दयानंद गंगली, सचिन सासुलकर आदी उपस्थित होते. अश्विनी सासुलकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com