वनरक्षक होण्याचे स्वप्न त्याला पोलिस कोठडीत घेऊन गेले

वनरक्षक होण्याचे स्वप्न त्याला पोलिस कोठडीत घेऊन गेले

वनरक्षक होण्याऐवजी तो गेला थेट कोठडीत

वनविभाग परीक्षाः शिये येथील परीक्षा केंद्रातील कॉपीप्रकरणी कारवाई

अभिजित कुलकर्णी, सकाळ वृत्तसेवा

नागाव, ता. ४ : वनरक्षक होण्याचे स्वप्न त्याला पोलिस कोठडीत घेऊन गेले... आणि दोन गुडघ्यांमध्ये आपला चेहरा लपवत मान खाली घालून गणेश नागलोत आपले भंगलेले स्वप्न उघड्या डोळ्यांनी पहात बसला. औरंगाबाद जिल्ह्यातील लांडकवाडी येथील अतिशय छोट्या वस्तीतील गणेश हा वनरक्षक होण्यासाठी कॉपी करत परीक्षा देत होता आणि त्याच्या कॉपीमुळे अन्य चारशे परीक्षार्थींची स्वप्ने अंधूक होऊन थेट परीक्षा केंद्र आणि केंद्र संचालकांना आरोपीच्या पिंजऱ्या‍त उभे करत होती.
शिये येथील आयओएन डिजिटल झोन या आॅनलाईन परीक्षा केंद्रामध्ये गुरुवारी (ता.३) सकाळी साडेआठ ते साडेदहा या वेळेत वनरक्षक गट क ची सरळ सेवा भरतीसाठी आॅनलाईन पध्दतीने परीक्षा सुरू होती. ही परीक्षा टीसीएस कंपनीद्वारे घेण्यात येत होती. यावेळी अंगातील कपड्यांमध्ये रबर कोटींग किपॅड डिव्हाइस, बनियानमध्ये गॅलॅक्सी जे ५ मॉडेलचा अँड्रॉइड मोबाईल, सिमकार्ड असे साहित्य नागलोत याच्याकडे मिळून आले. डिव्हाइसमुळे संगणकावर येणारा प्रश्न अॅटो स्कॅन होऊन थेट कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्याच्या मेलवर जात होते. अतिशय शिताफीने नागलोत याने सर्व यंत्रणेला चकवा देत परीक्षा दिली. मात्र अन्य परीक्षार्थींच्या नजरेतून तो सुटला नाही. त्यामुळे वनरक्षक होण्याचे स्वप्न त्याला पोलिस कोठडीत घेऊन गेले.
शिये (ता. करवीर) येथील आयओएन डिजिटल झोन या आॅनलाईन परीक्षा केंद्रामध्ये कॉपी करणाऱ्या‍ परीक्षार्थी आणि त्याला मदत करणारा एक जण अशा दोघांविरुध्द शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रतन नागलोत ( वय २३, रा. लांडकवाडी, रामेश्वरवाडी, पोष्ट खोडेगाव, ता. व जि. औरंगाबाद ) व जीवन नायमने (रा. बेभळ्याचीवाडी, खोडेगाव, ता. व जि. औरंगाबाद ) अशी त्यांची नावे आहेत. सामाजिक वनीकरणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सोनल केसरकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
...

परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंध
अधिनियमानुसार नागलोतवर कारवाई

महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियमानुसार नागलोत याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर वनपरीक्षेत्र अधिकारी केसरकर यांनी शासनाची दिशाभूल करत नागलोत याने पदासाठी अप्रामाणिक वागत शासनाला ठकवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com