नानीबाई चिखली - शिदोरी प्रेरणा पुरस्कार

नानीबाई चिखली - शिदोरी प्रेरणा पुरस्कार

01941
गीताताई कदम यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर
नानीबाई चिखली ता. १२ ः स्वतःच्या मूक-बधिर मुलाच्या जगण्यातून प्रेरणा घेऊन आणखी अशा मुलांचे दुःख नाहीसे करण्यासाठी संघर्ष व आर्थिक हाल सोसून निपाणीत नितीनकुमार कदम मूकबधिर विद्यालय स्थापन करणाऱ्या गीताताई सुरेश कदम (निपाणी) यांना परिवर्तन संस्थेकडून मातोश्री श्रीमती अनुराधा भोसले शिदोरी प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला. संस्थेचे मुख्य प्रवर्तक सचिन पवार, संस्थाध्यक्ष शिवराज भोसले पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
रविवारी (ता. १४) सायंकाळी ४ वाजता कौलगे (ता. कागल) येथे शिदोरी उपक्रमाच्या सांगतेप्रसंगी पुरस्कार वितरण होईल. रोख ११ हजार रुपये, मानपत्र, आकर्षक ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रस्ताव न मागता देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे.
मूकबधिर, मतिमंद मुलाचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या वेदनेतून प्रेरणा घेऊन एक एकर जमीन विकून गीताताई कदम यांनी २००४ मध्ये मूकबधिर विद्यालय सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com