चौथीत पृथ्वीराज सूर्यवंशी,
सातवीत अनुष्का पाटील प्रथम

चौथीत पृथ्वीराज सूर्यवंशी, सातवीत अनुष्का पाटील प्रथम

01620
अनुष्का पाटील
01621
पृथ्वीराज सूर्यवंशी

चौथीत पृथ्वीराज सूर्यवंशी,
सातवीत अनुष्का पाटील प्रथम
प्रज्ञाशोध परीक्षा; निकालात कागलची बाजी
सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. २४ ः जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता चौथीत शिरोळ तालुक्यातील तेरवाड शाळेचा पृथ्वीराज सूर्यवंशी १९२ गुण मिळवून प्रथम, तर इयत्ता सातवीमध्ये कागल तालुक्यातील म्हाकवे शाळेची अनुष्का पाटील ही विद्यार्थीनी १८८ गुण मिळवून प्रथम आली. निकालात कागल तालुका अव्वल ठरला. सातवीच्या यादीत दहापैकी कागलचे सात, तर चौथीच्या यादीत एक असे एकूण आठ विद्यार्थी यशस्वी झाले.
शंभर जणांच्या गुणवत्ता यादीत कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर तालुक्याचे वर्चस्व राहिले. जिल्हा परिषदतर्फे स्वनिधीमधून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील सर्व विद्यार्थ्याची २०० गुणांची प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित करणेत आली होती. यासाठी ४४५५९ विद्यार्थ्याची चाळणी परीक्षा झाली. ३८०० विद्यार्थ्यांची निवड परीक्षेमधून इयत्ता चौथी व सातवीतील जिल्हास्तरावर गुणानुक्रमे १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. जिल्हास्तरावर निवड झालेल्या पहिल्या तीन विदयार्थ्यांना पाच, चार व तीन हजार रुपये व उत्तेजनार्थ सात विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये बक्षीस, तर तालुकास्तर प्रथम तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५००, १००० व ५०० रुपये बक्षीस, प्रमाणपत्र व चषक दिला जातो. इतर सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जातात.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा झाली. परीक्षा समन्वयक म्हणून विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार व एम. आय. सुतार यांनी काम पाहिले. परीक्षेचे नियोजन उपशिक्षणाधिकारी आर. डी. पाटील, जयश्री जाधव, विस्तार अधिकारी आर. वाय. ठोकळ, गौरव पवार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com