रंकाळ्यात आढळले मोठे मृत मासे

रंकाळ्यात आढळले मोठे मृत मासे

01670


कोल्हापूर: रंकाळा तलावात तांबट कमान परिसरात मृत मासे आढळत आहेत.
...

रंकाळ्यात आढळले मृत मासे

तलावातील पाण्याचे नमुने पाठविले तपासणीसाठी

फुलेवाडी, ता.२७ः ऐतिहासिक रंकाळा तलावात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठे मासे मृत होत असल्याचे आढळून येत आहे.
तांबट कमान परिसरात तलावाच्या काठाला हे मासे तरंगत आहेत. काठावरील मृत मासे मोठ्या संख्येने कावळे खात असल्याचे चित्र दिसत आहे. यावर्षी तलावातील पाण्याला हिरवट रंग फारसा आलेला नाही. तरीही मोठे मासे कसे मृत झाले या कारणांचा शोध घेण्यासाठी रंकाळ्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
रंकाळा तलावातील पाणी प्रदूषणाची झळ वारंवार तलावातील जलचरांना बसत आहे. यापूर्वीही तलावातील मासे व कासव मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाऱ्यामुळे व पाण्यातील लाटांमुळे मृत मासे तांबट कमानीच्या आत रंकाळ्याच्या काठाला तरंगताना दिसू लागले आहेत. काठाला येऊन हे मासे पडल्याने त्याची दुर्गंधी सुटली आहे. कावळे मोठ्या संख्येने हे मासे खात आहेत.
पाणी प्रदूषण हे रंकाळ्याचे मूळ दुखणे आहे. मात्र प्रदूषण दूर करण्याच्या या मूळ समस्येकडेच दुर्लक्ष होत आहे. पाणी प्रदूषणाची स्थिती वारंवार गंभीर बनत चालली आहे. सांडपाणी तलावात मिसळणे बंद झालेले नाही. या सांडपाण्यामुळेच पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले की त्याचा जलचर प्राण्यांना धोका पोहोचतो. त्यामुळे महानगरपालिकेने रंकाळा विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असतानाच रंकाळ्यातील पाणी प्रदूषण कमी करण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com