रंकाळा धार्मिक प्रथा- परंपरा

रंकाळा  धार्मिक प्रथा- परंपरा
Published on

02388

रंकाळा तलावावर स्वच्छतेचा प्रश्‍न
धार्मिक विधींमुळे कचरा; पर्यावरणप्रेमींतून नाराजी

सकाळ वृत्तसेवा

फुलेवाडी ता. ३० : ऐतिहासिक रंकाळा तलावावर धार्मिक प्रथा-परंपरा वाढत आहेत. त्यामुळे स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत आहेत. येथे अनिष्ट प्रथा वाढू लागल्याने रंकाळाप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यातील मराठवाडा, विदर्भातील व कर्नाटकातील असंख्य लोक श्री अंबाबाईचे दर्शनासाठी येतात. काही लोक रंकाळा चौपाटीवरील राजघाटवर सकाळी उघड्यावर आंघोळ करतात. काही लोकांना चौपाटीवर बसवून त्यांची पूजा केली जाते. अनेकदा स्त्रियांच्या अंगात येते. हे प्रकार रंकाळ्यावर वर्षभर सुरू असतात.
दरम्यान शुक्रवारी सकाळी चौपाटीवर एकाच वेळी मोठ्या संख्येने स्त्री-पुरुषांना बसवून त्यांची पूजा सुरू होती. रंकाळा संरक्षक भिंतीवर मूर्ती ठेवून हारतुरे घालून पुजण्यात आले. सकाळीच ही बाब रंकाळा मॉर्निंग वॉकर्सच्या निदर्शनास आली. चौपाटीभर हा कार्यक्रम सुरू होता. रंकाळा टॉवर ते तांबट कमान दरम्यानच्या मुख्य मार्गावरच टेम्पो, ट्रॅव्हलर लावून तिथेच हे लोक जेवण करतात. केरकचरा तेथेच टाकला जातो. रंकाळ्यावर होणाऱ्या प्रथा-परंपरा पर्यावरणदृष्ट्या व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून चुकीच्या असल्याचे मत रंकाळाप्रेमींनी व्यक्त केले. अशा प्रकारांना येथे पालिकेने पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.

कोट
रंकाळ्यावर सुरु असलेल्या प्रथा थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. अन्यथा रंकाळा भोंदूबाबांचे प्रमुख ठिकाण होईल. पुरोगामी कोल्हापुरात, ऐतिहासिक रंकाळ्यावर अशा गोष्टींना पायबंद आवश्यक आहे.
-दिलीप देसाई, रंकाळाप्रेमी

रंकाळ्यासारख्या सुंदर, ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी होणारा हा प्रकार निंदनीय आहे. एकीकडे रंकाळ्याच्या संवर्धनासाठी जीवाचे रान करत असताना असल्या प्रवृत्ती येथून हद्दपारच करायला हव्यात. त्यासाठी कठोर पावले उचलावीत.
- सीमा पाटील, अंधश्रध्दा निर्मूलन समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com