दहावीचाही टक्का घसरला

दहावीचाही टक्का घसरला

राज्यात टक्का घसरला

पुणे, ता. २ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२३ मधील दहावीच्या परीक्षेत १४ लाख ३४ हजार ८९८ म्हणजेच ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तब्बल १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल ३.११ टक्क्यांनी खाली घसरला आहे. राज्यात कोकण विभागातील ९८.११ टक्के सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा (९२.०५ टक्के) आहे. राज्य मंडळाने २ ते २५ मार्चदरम्यान दहावीची लेखीपरीक्षा घेतली होती. सर्व विभागीय मंडळांतून ९५.८७ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी, तर ९२.०५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची आकडेवारी ३.८२ टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात नऊ विभागीय मंडळांतून ३६ हजार ६४८ पुनर्परीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्यातील ६०.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २० हजार ५६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ७४.२५ टक्के आहे. आठ हजार ३१२ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी सात हजार ६८८ विद्यार्थी (९२.४९ टक्के) उत्तीर्ण झाले.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये
- १०० टक्के निकाल असणाऱ्या विषयांची संख्या : २५
- १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या : ६,८४४
- १०० टक्के गुण असणारे विद्यार्थी : १५१ (१०८ सर्वाधिक विद्यार्थी लातूरमध्ये)
- उत्तीर्णांत तृतीयपंथी विद्यार्थी ः २३
- निकाल ठेवलेले विद्यार्थी ः ९५
- तीन विद्यार्थ्यांना केले प्रतिबंधित

नियमित विद्यार्थ्यांची आकडेवारी
तपशील : मुले : मुली : एकूण
नोंदणी केलेले : ८,२१,५२४ : ७,२०,१४२ : १५,४१,६६६
परीक्षा दिलेले : ८,१४,१६१ : ७,१४,९३५ : १५,२९,०९६
उत्तीर्ण झालेले : ७,४९,४५८ : ६,८५,४४० : १४,३४,८९८
उत्तीर्णतेची टक्केवारी : ९२.०५ टक्के : ९५.८७ : ९३.८३


विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी (टक्क्यांत)
विभागीय मंडळ : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी
पुणे : २,५८,७९३ : २,४७,५३१ : ९५.६४ टक्के
नागपूर : १,४९,७०२ : १,३७,८१२ : ९२.०५ टक्के
औरंगाबाद : १,७६,८४६ : १,६४,८८५ : ९३.२३ टक्के
मुंबई : ३,३५,१२० : ३,१३,८७६ : ९३.६६ टक्के
कोल्हापूर : १,२८,५०३ : १,२४,३१२: ९६.७३ टक्के
अमरावती : १,५६,५७३ : १,४५,९६५ : ९३.२२ टक्के
नाशिक : १,९२,७५४ : १,७७,७७६ : ९२.२२ टक्के
लातूर : १,०२,८८२ : ९५,३४५ : ९२.६७ टक्के
कोकण : २७,९२३ : २७,३९६ : ९८.११टक्के

परीक्षेतील गैरप्रकार
तोतयेगिरी : ००
कॉपी : ११६
शिक्षक साह्य : ०२ :
इतर : २४८
एकूण : ३६६

‘टॉप पाच’ जिल्हे
जिल्हे : उत्तीर्णतेची टक्केवारी
सिंधुदुर्ग : ९८.५४
रत्नागिरी : ९७.९०
कोल्हापूर : ९७.२१
सातारा : ९६.७२
बीड : ९६.२४
सांगली : ९६.०८

शाळांच्या निकालाची टक्केवारी
- शून्य टक्के निकालांच्या शाळा : ४३
- शंभर टक्के निकालांच्या शाळा : ६,८४४

टक्केवारीनिहाय विद्यार्थ्यांची संख्या
१०० टक्के : १५१
९० टक्के आणि त्यापेक्षा जास्त : ६६,५७८
८५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त : १,०९,३४४
८० टक्के आणि त्यापेक्षा जास्त : १,४६,९६१
७५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त : १,६७,३८४
७० टक्के आणि त्यापेक्षा जास्त : १,७५,६६७
६५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त : १,७३,३००
४५ टक्के ते ६० टक्क्यांपर्यंत : ३,४१,३९०
बार चार्ट करणे

सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी
मिळालेल्या सवलतीचा प्रकार : विद्यार्थ्यांची संख्या
शास्त्रीय नृत्य : १,७६८
शास्त्रीय गायन : २,३१८
शास्त्रीय वादन : १,३८९
लोककला : २४,१६०
नाट्य : १६
चित्रकला : १,१७,७८३
क्रीडा : २५,१६१
एनसीसी : ४८
स्काउट गाइड : ९४३
एकूण : १,७३,५८६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com