

प्रेमविवाहाच्या रागातून
जेवणात कालविले विष
स्वागत समारंभात तरुणीच्या मामाचे कृत्य
सकाळ वृत्तसेवा
पन्हाळा, ता. ७ ः भाचीने केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून एकाने स्वागत समारंभातील भोजनात विष कालवल्याचे आज उघड झाले. या प्रकरणी पन्हाळा पोलिसांत संबंधित तरुणीच्या मामाविरोधात अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार तालुक्यातील उत्रे येथे दुपारी घडला.
महेश जोतीराम पाटील असे संशयिताचे नाव आहे. नवरदेवाचे काका संजय गोविंद पाटील यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः पाटील याच्या भाचीने प्रेमविवाह केला. त्याचा स्वागत समारंभ उत्रे येथील गुरुदेव सांस्कृतिक कार्यालयात आयोजित केला होता. स्वागत समारंभाची लगबग सुरू होती. आलेल्या पाहुण्यांसाठी भोजनही तयार करण्यात आले होते. भाचीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात असलेला मामा महेश जोतीराम पाटील याने विष टाकले. त्याने प्लास्टिक बाटलीतून विषारी द्रवपदार्थ आणला होता. तो त्याने हेतुपुरस्सर बनवलेल्या अन्नपदार्थांमध्ये टाकला. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. तसेच अन्नाची नासाडी झाली, अशी फिर्याद संजय पाटील यांनी दिली. त्यावरून पन्हाळा पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक कोंडुभैरी तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.