
उदय दुध संस्थेची निवडणुक जाहीर
उदय दुध संस्थेची
निवडणुक जाहीर
पोर्ले तर्फे ठाणे. ता. ३० : पोर्ले तर्फे ठाणे (ता. पन्हाळा) येथील जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर दुध उत्पादन असणाऱ्या उदय सहकारी दुध संस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी बाजार समितीचे माजी सभापती व उदय समूहाचे नेते परशुराम खुडे व नायकु खवरे यांच्या नेतृत्वाखालील श्री मसाईदेवी उदय सहकार सत्तारूढ पॅनल व उदय दुध संस्थेचे माजी अध्यक्ष सदाशिव साळोखे व कृष्णात काशिद यांच्या नेतृत्वाखालील श्री मसाईदेवी उदय सहकार परिवर्तन पॅनल यांच्यात लढत होत आहे. या संस्थेची निवडणूक संस्था स्थापने पासून म्हणजे गेल्या ४३ वर्षभरात दुसऱ्यांदा निवडून लागत आहेत. एक मेकांचे विचार न पटल्याने दोन्ही बाजूंनी पॅनल जाहीर करण्यात आले. दोन्ही पॅनलमध्ये विद्यमान संचालकासह नवोदितांना दोन्ही बाजूंनी संधी दिली आहे.
या संस्थेचे दैनंदिन दुध संकलन ४००० लिटर आहे. संस्थेत ६६८ सभासद आहेत. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत १३ जागेसाठी एका अपक्षासह २७ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून एन. पी. दवडते काम पाहत आहेत.