पोर्ले-शर्यत

पोर्ले-शर्यत

01526, 01527

पोर्ले तर्फ ठाणेत पडवळवाडीची बैलजोडी प्रथम
मसाईदेवी यात्रेनिमित्त स्पर्धा; विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
पोर्ले तर्फे ठाणे, ता. २६ : येथील मसाईदेवी यात्रा गुढीपाडव्यानिमित्त शिवसेना शाखा पोर्ले, कै. गणपती चेचर (आबा) समर्थक व उदय युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जनरल बैलगाडी स्पर्धा झाल्या. जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
स्पर्धेत बाळू शामराव पडवळ (पडवळवाडी) यांच्या गाडीने प्रथम क्रमांक मिळवला. दुसरा क्रमांक प्रदीप गाडगीळ (पाचगाव) तर तिसरा क्रमांक बाळासो चव्हाण (दरेवाडी) यांनी मिळविला. अन्य निकाल असा : दुस्सा चौसा बैलगाडी गट - प्रथम क्रमांक प्रदीप अस्वले (सोनतळे) , द्वितीय क्रमांक केतन यादव (पाडळी ), तिसरा क्रमांक सागर महादेव साळोखे (पोर्ले). बिनदाती बैलगाडी गट - प्रथम क्रमांक तानाजी बोरचाटे (पोहाळे), द्वितीय क्रमांक सौरभ पाटील (आसुर्ले), तृतीय क्रमांक तानाजी जाधव (पोर्ले), एक्का बैल पळवणे गट - प्रथम क्रमांक कृष्णात आळवेकर (कोल्हापूर ), द्वितीय क्रमांक अजित शिंदे (निगवे) , तृतीय क्रमांक अवधूत पालकर (पाडळी),
सुट्टा घोडा पळवणे गट - प्रथम क्रमांक सोना पाटील (जवाहरनगर), द्वितीय क्रमांक विरेश सरपोतदार (बावडा), गणेश सिद्ध (पोर्ले), घोडागाडी पळवणे - प्रथम क्रमांक गौरव मोरे (हणमंतवाडी) , द्वितीय क्रमांक बाबासो गवळी (पोर्ले ), तृतीय क्रमांक ऋतूराज चौगुले (कोगे). विजेत्यांना विलास साळोखे, कृष्णात घाडगे, विकास खुडे, भैरू चेचर, तानाजी भोपळे, संजय खवरे, दशरथ जाधव, सागर चेचर, बाबासो गवळी, सागर साळोखे, प्रदीप पाटील, सर्जेराव सासने , विकास घाटगे, दिलीप घाटगे, अक्षय चौगुले, उमेश चौगुले, मिथुन चौगुले, पांडू चेचर आदींसह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com