तिव्र आंदोलन करण्याचा इशारा

तिव्र आंदोलन करण्याचा इशारा

०१९६१
वडगाव तालुक्यासाठी बैठक
तीस ग्रामपंचायतींचा पाठिंबा; एकजुटीने लढण्याचा निर्धार

पेठवडगाव, ता. १ : वडगाव स्वतंत्र तालुका मागणीसाठी तालुक्यातील तीस गावांतील सरपंच, उपसरपंचांची बैठक झाली. बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देणे, मागणीचा प्रस्ताव करणे, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना निवेदन देण्याचे ठरले. तालुक्याची मागणी मान्य होईपर्यत शांत बसायचे नाही, असा निर्धार केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ होते.
येथील श्री. बळवंतराव यादव हायस्कूलच्या मैदानावर वडगाव स्वतंत्र तालुका मागणीसाठी आयोजीत बैठकीत वरील निर्णय झाला. बैठकीस वडगाव परिसरातील ३० गावांतील ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पेठवडगाव तालुका कृती समितीच्या निमंत्रक विद्या पोळ म्हणाल्या, ‘अनेक वर्षांपासून जनतेस हातकणंगलेस हेलपाटे मारावे लागतात. दळण-वळण, सुविधांच्या दृष्टीने परिसरातील गावांसाठी वडगाव शहर मध्यवर्ती आहे. तालुक्यासाठी नागरिकांनी एकजूट व तीव्र लढा देणे गरजेचे आहे.’
विजय शहा म्हणाले, ‘हातकणंगले तालुका अडीच ब्लॉगचा मोठा तालुका आहे. पश्चिम भाग अविकसित राहिला. कार्यालयास जागा देण्यास पालिका तयार आहे.’
तालुका कृती समितीचे अध्यक्ष गुलाबराव पोळ म्हणाले, ‘तालुका मागणीचा प्रस्ताव करुन दिला जाईल. या प्रश्‍नाबाबत शिस्तबद्ध आंदोलन करायचे आहे. संबंधित चार आमदार व खासदारांचेही पाठिंब्यासाठी पत्र घेतले पाहिजे.’
यावेळी माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, सुनील हुक्केरी, गुरुप्रसाद यादव, सरपंच दीप्ती माने (अंबप), सरपंच स्नेहल माने (भेंडवडे), उपसरपंच बाबासो भोपळे(लाटवडे), वारणा दूध संघाचे संचालक अरूण पाटील (कुंभोज), ॲड. एन. आर. पाटील, वारणा बँकेचे संचालक धोंडीराम सिद, माजी पंचायत समिती सदस्य अजय पाटील, शिवाजी माने, ॲड. शहाजी पाटील, शहाजी सिद, दिलीप गुरव, मनोज पिसे, जवाहर सलगर, अभिजीत गायकवाड यांची भाषणे झाली. राजकुमार चौगुले यांनी प्रास्ताविक, दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन, तर सचिन पाटील यांनी आभार मानले.
--------
चौकट
तालुका मागणीचे तीस ठराव
वडगाव तालुका मागणीसाठी कृती समितीच्यावतीने प्रत्येक ग्रामपंचायतीचा ठराव घेतला जात आहे. मागणीचे तीस ग्रामपंचायतींचे ठराव कृती समितीकडे दाखल झाले आहेत. काही ग्रामपंचायत सरपंचांनी बैठकीत ठराव आणून दिल्याने मागणीस बळकटी मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com