दोनशे गायींच्या पिण्याच्या पाण्यासाठी काटेभोगावला उपोषण.

दोनशे गायींच्या पिण्याच्या पाण्यासाठी काटेभोगावला उपोषण.

03782
दोनशे गायींच्या पिण्याच्या
पाण्यासाठी काटेभोगावला उपोषण
पुनाळ, ता. १९ : काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील बाबा रेडकर गो गीता सेवा संस्थेच्या गोशाळेतील गाईंना चारापाणी, नुकसानभरपाई मिळण्यासाठी संस्थापक अध्यक्ष आबा कांबळे यांनी बेमुदत उपोषणाला सुरवात केली.
याबाबत तहसीलदारांतर्फे बाजारभोगांव सर्कल बी. एस‌ .खोत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सरकार हक्कातील गटनंबर ६०० जमिनीमध्ये तुम्हाला गाई चारण्यासाठी अडथळा होणार नाही. जळीताचा प्रश्न पत्रव्यवहार करून निकालात काढू. पशुसंवर्धन विभागाकडे अर्थसहाय्यासाठी दिलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, गाईंना पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी गटविकास अधिकारी श्री. सावंत यांना टँकरने पाणी देण्याविषयी सूचना केल्या होत्या. त्यांच्याकडून बारा एप्रिलपासून फक्त दोन टँकर पाणी देऊन टँकर देण्याचे बंद केले. त्यामुळे आबा कांबळे यांनी पूर्ववत दररोज टँकर किंवा नैसर्गिक पाण्याची व्यवस्थेबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्णय घेतला. यावेळी तलाठी पूनम महाजन, ग्रामसेवक मनिषा जाधव, सुभाष सावंत, रघू खाटांगळेकर, सरपंच रवी पाटील, पोलिसपाटील संभाजी पाटील व पोलिस अधिकारी अशोक निकम व संस्थेच्या अध्यक्षा आनंदी कांबळे, माजी उपाध्यक्ष सरदार आंग्रे, गणपती पाटील, रमाकांत कांबळे, नामानंद कांबळे, मंदाकिनी कांबळे, सुनंदा कांबळे, विनायक साळुंखे, प्रमिला वनकोरे ,भक्ती कांबळे, बापूजी कांबळे उपस्थित होते.

कोट
पठारावर दोनशे गायी आहेत. येथील नैसर्गिक स्रोत आटले आहेत. जोपर्यंत मुक्या जनावरांच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवणारण
- आबा कांबळे, सर्वोदयी कार्यकर्ते, काटेभोगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com