
प्रकाशन साेबत फाेटाे
03125
कुरुकलीत भित्तीपत्रक विशेषांकाचे प्रकाशन
शाहूनगर ः कुरुकली (ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयात भित्तीपत्रक कमिटी व हिंदी विभागातर्फे भित्तीपत्रक विशेषांकाचे प्रकाशन झाले. भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. विशेषाांकात इतिहासातील कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे. विद्यार्थिनी स्नेहा पाटील यांच्या कर्तबगार स्त्रियांची रेखाटने यांचे प्रदर्शन झाले. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, राधानगरीच्या पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले, हिंदी विभागप्रमुख डॉ.पी. सी. लाड, कमिटीप्रमुख प्रा. शोभा पाटील, प्रा. डॉ. व्ही. एस. काळेबाग, पर्यवेक्षिका प्रा. एन. एल. जमादार, शामराव काेईगडे, प्रा. डी. के. दळवी, प्रा. डॉ. ए. पी. कांबळे, प्रा. व्ही. पी. मालेकर, प्रा. सागर चौगले, प्रा. एम. बी. थोरात उपस्थित होते.