कोल्हापूरचा कारभारी गोडवा ब्रॅड सर्वदुर पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार, जिल्हाधिकारी राहुल रेखावर.

कोल्हापूरचा कारभारी गोडवा ब्रॅड सर्वदुर पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार, जिल्हाधिकारी राहुल रेखावर.

01407
कारभारवाडी : येथे प्रकल्पाची पाहाणी करतांना जिल्हाधिकारी रेखावार, प्रा. नेताजी पाटील, तेजस्विनी पाटील, जालिंदर पांगरे आदी.

कारभारवाडीला
आदर्श वाडी बनवणार

जिल्हाधिकारी रेखावार; विविध प्रकल्पांची पाहणी
सोनाळी ता. ३ ः महिलांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहभागाने शाश्वत विकासासाठी निर्माण होणाऱ्या कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोचवून कारभारवाडी राज्यात आदर्श वाडी बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला.
कारभारवाडीला (ता. करवीर) येथे आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट देवून गटशेतीअंतर्गत कै. शिवा रामा पाटील कृषी शेतकरी स्वयंसहाय्यता गटांतर्गत विविध प्रकल्पांची पाहणी करुन विद्यार्थिनी, महिला व ग्रामस्थांशी संवाद साधला. शासकीय योजनांची माहिती देवून लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, अध्यक्ष प्रा. डॉ. नेताजी पाटील, उपसरपंच तेजस्विनी पाटील, सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘नवनवीन उपक्रम राबवून शाश्वत विकासावर भर द्यावा. प्रशासनाच्या वतीने आवश्यक सहकार्य करू. विविध प्रकल्प महिलांच्या पुढाकाराने होत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. कुक्कुटपालनसारख्या उद्योगनिर्मितीलाही चालना द्यावी.’
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी येथील सिंचन व्यवस्था,आधुनिक आरोग्यदायी गुळ प्रक्रिया युनिटला भेट देवून रसायन विरहित गुळ निर्मितीची पाहणी केली.तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.महिलांकडून चालवण्यात येणाऱ्या चटणी मशीन,शेवया मशीन,विविध मसाले तयार करणाऱ्या कृषी माल प्रक्रिया मशीनरींची पाहणी करुन महिलांना उद्योगधंद्यांसाठी आवश्यक कर्जपुरवठा होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल,असे आश्वासन त्यांनी दिले. कारभारवाडीमध्ये ठिबक सिंचनाने शेतीला पाणीपुरवठा, आंतरपिके, गांडूळ खतनिर्मिती, ग्रीन हाऊस, सिंचन सुविधा, आधुनिक आरोग्यदायी गुळ प्रक्रिया युनिट, कृषीमाल प्रक्रिया मशिनरी आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून हळद, जिरे, धने पावडर, आकाशकंदील, विविध चटण्या, खाद्यतेल, मसाले, शेवया, पापड तयार करुन बाजारात आणण्याची तयारी सुरु आहे.या सर्व उद्योगांच्या माध्यमातून कारभारवाडीमध्ये ''स्वयंपूर्ण खेडे''संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे गटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नेताजी पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com