प्रतिपंढरपूर नंदवाळात जया एकादशी माघी वारी उत्साहात.

प्रतिपंढरपूर नंदवाळात जया एकादशी माघी वारी उत्साहात.

03154
नंदवाळ परिसर दुमदुमला
विठूनामाच्या जयघोषाने

माघी वारी सोहळ्यास भाविकांची गर्दी

सोनाळी, ता. २० ः प्रतिपंढरपूर नंदवाळ ( ता. करवीर ) येथे जया एकादशी, माघी वारी सोहळा भाविक व वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहाने झाला. रात्री तीन वाजता भाजपचे करवीर तालुका अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे, गीता मेडशिंगे यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा करण्यात आली. यावेळी महाअभिषेक करण्यात आला. मंदिर समितीतर्फे विठ्ठल-रुक्मिणीची आकर्षक पूजा बांधली होती. काकड आरतीनंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. पहाटेपासूनच खांद्यावर भगवे पताका घेतलेले वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला टाळ मृदुंगाचा गजर करत विठू नामाच्या जयघोषत दिंड्या नंदवाळच्या दिशेने येत होत्या. यावेळी विठू नामाच्या जयघोषाने नंदवाळ परिसर भक्तीमय वातावरणात चिंब होऊन गेला होता. आलेल्या भाविक वारकऱ्यांना संदीप शिंदे, काशिनाथ कानडे यांच्यातर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून गेला होता. मंदिरात भजन, कीर्तनाचे कार्यक्रम झाले.
सरपंच अमर कुंभार, उपसरपंच सचिन कोंडेकर, मंदिर व्यवस्थापक भीमराव पाटील, वाय. डी. पाटील, सुभाष मेथे, दीपक शिंदे, बबन पाटील, सागर पाटील, दत्तात्रेय वागवे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com