शिक्षकांच्या समर्पित सेवेतून देशाचा विकास - संजयबाबा घाटगे

शिक्षकांच्या समर्पित सेवेतून देशाचा विकास - संजयबाबा घाटगे

02116

शिक्षकांच्या समर्पित सेवेतून विकास - संजयबाबा घाटगे

सेनापती कापशी : देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाची प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबवली पाहिजे. शिक्षकाने समर्पितवृत्तीने काम केले तर देशाचा विकास होतो, असे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले. मुगळी (ता. कागल) येथील मुख्याध्यापक आर. डी. पाटील यांच्या निवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पांडुरंग पसारे होते. श्री. घाटगे म्हणाले, ‘आजच्या हावरट व्यवस्थेत शिक्षकांनी मुलांमध्ये गुणवत्ता आणि समाजाप्रती संवेदनशीलता निर्माण करावी.’ आर. डी. पाटील म्हणाले, ‘चिरकाल टिकणाऱ्या शिक्षण प्रक्रियेत जीवन समर्पित करण्याचे भाग्य लाभले. हे अविस्मरणीय आणि अत्यंत आनंददायी आहे.’ रोहिणी ढेंगे, अंबिका जगदाळे, व्ही. जी. पोवार, पांडुरंग पसारे, आर. एस. जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. अरुंधती घाटगे, सरपंच मेघा पाटील, मनीषा कांबळे, दत्तात्रय वालावलकर, सोनूसिंह घाटगे, उदय पसारे उपस्थित होते. विवेक गवळी, रमेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम करडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com