Sat, Sept 23, 2023

श्री छत्रपती शाहू बिगर शेती सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
श्री छत्रपती शाहू बिगर शेती सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
Published on : 4 June 2023, 1:38 am
छत्रपती शाहू बिगर शेती सहकारी
पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
सेनापती कापशी : येथील श्री छत्रपती शाहू बिगर शेती सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली. २००० साली स्थापन झालेल्या संस्थेने बिनविरोधची परंपरा कायम ठेवली आहे. संस्थेची सुरवात २६७ सभासदांनी झाली. सध्या ६२५ सभासद आहेत. संस्थेच्या सात कोटी ८६ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. चार कोटी ७५ लाख रुपये कर्जपुरवठा केला आहे. चंद्रकांत माळी व प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे: दत्तात्रय कामते, अनिल कुरणे, प्रकाश पाटील, जयसिंग भोसले, धनाजी खराडे, कुंदन मोरे, मनोहर कांबळे, सुवर्णा पाटील, मालुताई माळी, भीमराव कुंभार, संदीप ढोबळे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. पी. खामकर यांनी काम पाहिले.