सरवडे

सरवडे

सरवडेत बाजारपेठ बंद
ठेवून पाळला दुखवटा

सरवडे, ता.१८: मिरज येथे काल बुधवारी झालेल्या भीषण अपघातात सरवडे येथील जयवंत पोवार यांच्यासह पत्नी स्नेहल व मुलगा सोहम यांचा मृत्यू झाला. या कुटुंबावर काळाचा घाला पडल्याने सर्व ग्रामस्थांवर दु:खाची छाया पसरली. रात्री तीनही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, एकाच घरातील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याने आज गावातील बाजारपेठ बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला.
काल दुपारी बारा वाजता अपघाताची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. प्रत्येकजण अपघाताची चौकशी करून हळहळ व्यक्त करीत होता. रात्री उशिरा तीनही मृतदेह सरवडे येथे आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती. मृतदेह पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले होते, तर महिलांना अश्रू अनावर होत होते. देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबावर असा अचानक घाला पडल्याने हळहळ व्यक्त होत होती. तिघांच्या मृतदेहांना अग्नी देताना अश्रूंचे बांध फुटत होते. ही घटना प्रत्येकाच्या मनात घर करून बसली होती. त्यामुळे संपूर्ण गाव शोककळेत बुडाला होता.
गुरुवारीही कालचे दु:ख कायम होते. त्यामुळे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला. आज दिवसभर बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व घटकांनी आपले उद्योग व्यवसाय बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, पोवार यांच्या घरी सांत्वनासाठी रीघ लागली होती. लोकप्रतिनिधी, मान्यवरांनी पोवार यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन सांत्वन केले.गकअिअअअअअअअअअइइइइइइइइइइइइइकिग्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com