सोळांकूर

सोळांकूर

03508
फराळे ः येथील बाबुराव पाटील यांचा जळालेला जनावारांचा गोठा.

फराळेत गोठ्यास आग; ६ म्हैशी मृत्यूमुखी
शाँर्टसर्किटमुळे घडला प्रकार; एक म्हैस गंभीर; शेतकरीही जखमी

सोळांकूर,ता.१८: फराळे,(ता. राधानगरी )येथील बाबूराव बाळू पाटील यांच्या गोठ्याला रात्री उशिरा शाँर्टसर्किटने आग लागून सहा मुर्हा जातीचा म्हैशी होरपळून मृत्यूमुखी पडल्या, तर एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. आगीत बाबुराव पाटील हे शेतकरीही जखमी झाले आहेत. आगीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, ही घटना बुधवारी रात्री घडली. बाबुराव पाटील यांचा घरालगतच जनावरांचा मोठा व सुसज्ज गोठा आहे. ते रात्री साडेदहाच्या सुमारास जनावरांना वैरण घालून दरवाजा बंद करून झोपण्यासाठी घरी गेले होते. त्यानंतर रात्री बाराच्या दरम्यान पाटील यांच्या गोठ्याला आग लागल्याचे शेजारील काही महिलांच्या निदर्शनास आले. महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर बाबुराव पाटील गोठ्याजवळ पोहचले. ताबडतोब पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु गोठ्यातील माळ्यावर वैरण असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. रात्रीची वेळ असल्याने मदत व बचाव कार्यात मर्यादा येत होत्या. यामध्ये गोठाघर अक्षरशः जळून खाक झाले. सहा मुर्हा म्हैशीचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला, तर एका म्हैशीला वाचवण्यात यश आले. परंतु ,त्याही म्हैशीला गंभीर भाजले आहे. ज्या जनावारांचा जीवावर पाटील कुटुंबाचा पोटप्रपंच होता त्या जनावरांचा डोळ्यादेखत होरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, अभिजीत तायशेटे, किसन चौगले, आर. के. मोरे, अरुण जाधव, नंदकिशोर सुर्यवंशी यांनी भेट दिली. गटविकास अधिकारी संदिप भंडारे, तलाठी धनश्री संकपाळ, ग्रामसेवक तानाजी परीट यांनी पंचनामा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com