डॉ. आंबेडकर पुतळा समिती अध्यक्षपदी यड्रावकर

डॉ. आंबेडकर पुतळा समिती अध्यक्षपदी यड्रावकर

डॉ. आंबेडकर पुतळा समिती अध्यक्षपदी यड्रावकर
शिरोळमधील बैठकीत निर्णय; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
शिरोळ, ता. ५ ः विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या अध्यक्षपदी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची निवड केली. सचिवपदी डॉ. सुभाष सामंत, सहसचिव सुरेश कांबळे, खजिनदार उत्तम वाघवेकर तर निमंत्रक म्हणून अभिजित आलासकर यांच्या निवडी केल्या. तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आज येथे बैठक झाली.
जयसिंगपूरमध्ये डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जावा, अशी शिरोळ तालुक्यातील आंबेडकरवादी जनतेची अनेक वर्षाची मागणी होती. २०१९ ची आमदारकीची निवडणूक लढवताना आमदार यड्रावकर यांनी जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे उभारणार असल्याची ग्वाही दिली होती. यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम जयसिंगपूर शहरात अंतिम टप्प्यात आहे. डॉ. आंबेडकर यांचा पुतळा जयसिंगपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी व्हावा, अशी चळवळीतील कार्यकर्त्यांची आग्रही मागणी झाल्यामुळे आमदार यड्रावकर यांनी पुतळा जयसिंगपूर शहरातील मध्यवर्ती क्रांती चौक परिसरातच उभारला जाईल, असा निर्णय घेतला. त्यासाठीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.
आमदार यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापक शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीच्या कामाला तातडीने सर्व प्रकारची मदत करावी, या मागणीचे निवेदन देण्याचे बैठकीत ठरले. संजय शिंदे, बी. आर. कांबळे, सूर्यकांत कांबळे, डॉ. सुभाष सामंत, अभिजीत अलासकर, जयपाल कांबळे, अब्दूल बागवान, सुरज कांबळे, सुनिता पवार आदी उपस्थित होते.
पुतळा समिती सदस्यपदी ः ॲड. इंद्रजित कांबळे, ॲड. शीतल कांबळे, राजेश शिंदे, सुभाष साठे, डॉ. अतिक पटेल, मिलिंद भिडे, रघुनाथ देशिंगे, आण्णासाहेब पाटील, केशव राऊत, पद्माकर कांबळे दानोळी, बापू कांबळे, शरद कांबळे (उमळवाड), महावीर कांबळे, गौतम दिक्षांत, राजू मांजर्डेकर, विकास कांबळे (चिपरी), दिलीप कांबळे, स्वाती सासणे, मल्हारी सासणे, शिवाजी कांबळे (उदगांव), अविनाश कांबळे, दगडू माने, दिगंबर सकट, राजेंद्र प्रधान, सुरज कांबळे, चिदानंद कांबळे, संजय शिंदे, अभिजीत कांबळे, पुलकेश कांबळे (शिरोळ), बाबासाहेब कडाळे, सुनील कुरुंदवाडे, धम्मपाल ढाले, अनुप मधाळे, सुचितोष कडाळे आदींचा समावेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com