‘पीएम किसान’चा लाभ द्या

‘पीएम किसान’चा लाभ द्या

Published on

00948
शिरोळ ः येथे आंदोलन अंकुशच्यावतीने तहसीलदार अजित हेळकर यांना निवेदन दिले.
-------
‘पीएम किसान’चा लाभ द्या
शिरोळमध्ये आंदोलन अंकुशतर्फे मागणी; आंदोलनाचा इशारा
शिरोळ, ता. ६ ः तालुक्यातील पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना योजनेचा तत्काळ लाभ द्यावा. अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार अजित हेळकर यांना दिला आहे.
आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राकेश जगदाळे यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार हेळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. श्री. चुडमुंगे म्हणाले, ‘वर्षभर पीएम किसन योजनेतील लाभार्थ्यांना योजनेची अंमलबजावणी कोणी करावयाची? याबाबत एकमत नव्हते. यामुळे शासनाने हे काम कृषी विभागाकडे दिले आहे. तथापि तालुका कृषी अधिकाऱ्यांची बदली झाल्याने, नूतन तालुका कृषी अधिकारी यांचे थम अद्यापही कार्यरत नाही. यामुळे ऑनलाईन प्रणाली द्वारे लाभार्थ्यांना, या योजनेचा लाभ देण्यात अडथळा निर्माण झाला आहे.’ शेतीमालाला उत्पादन खर्चावर दर मिळत नसल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्याचे प्रमुख या नात्याने पीएम किसन योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना तत्काळ लाभ मिळवून द्यावा. अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चुडमुंगे यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.