शिरोली : आयडियलचे पारितोषिक वितरण

शिरोली : आयडियलचे पारितोषिक वितरण

‘आयडियल’मध्ये पारितोषिक वितरण
शिरोली पुलाची: विद्यार्थ्यांनी खेळ, मनोरंजन आणि अंगभूत कलेला वाव देताना अभ्यासालाही महत्व द्यावे. परिस्थितीचा कधीही विचार न करता संघर्षाची तयारी ठेवल्यास यश नक्की मिळते. प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशाचा आनंद जगावेगळा असतो. त्यामुळे मोठी स्वप्ने बघून ती पूर्ण करण्यासाठी धडपड करा असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी केले.
आयडियल इंग्लिश स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयाचे अधीक्षक व राष्ट्रीय खेळाडू वसंत पाटील होते.विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी तसेच शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा उद्योजक गोविंद जाधव,सूर्योदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, सचिव प्रा. दिपक पाटील, विवेकनाथ पाटील, वैभव शिंदे, संदीप चौगुले यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. मुख्याध्यापक आर. जी. कुंभार यांनी स्वागत केले. मुख्याध्यापिका डी. एस .वंडकर प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन एस. आय. शेख व सौ. व्ही. एस. शिंदे यांनी केले. आभार भाग्यश्री पाटील यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com