पाणीसाठा

पाणीसाठा

धरणातील पाणीसाठ्यात घट
‘काळम्मावाडी, राधानगरी, तुळशी’तील स्थिती

राधानगरी ता. १६ : गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजमितीस काळम्मावाडीसह राधानगरी व तुळशी धरणातील पाणीसाठ्यातील घट वाढली आहे. सर्वाधिक कमी म्हणजे २१ टक्के इतका कमी पाणीसाठा काळम्मावाडी धरणात आहे. राधानगरीत दोन आणि तुळशीत पाच टक्के पाणीसाठा कमी आहे.
या धरणातील पाणीसाठा तुलनात्मकदृष्ट्या कमी असला तरी पुढील दोन महिन्यांतील पाणी वापराच्या जलसंपदा विभागाच्या नियोजनामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत तो पुरेसा आहे. उपलब्ध पाणीसाठा वापराच्या काटेकोर नियोजनामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत तिन्ही धरणांच्या लाभक्षेत्रात पाणी तुटवडयाचे सावट राहणार नाही.
गळती रोखण्यासाठीच्या मे महिन्यातील प्रस्तावित ग्राऊंटिंग कामासाठी गेल्या पावसाळ्यात काळम्मावाडी धरणात क्षमतेपेक्षा कमी म्हणजे २५.४० टीएमसीऐवजी २० टीएमसी इतकाच पाणीसाठा करण्यात आला आहे. त्यापेक्षा आजच्या दिवशी सहा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. दरवर्षी तितकाच पाणीसाठा पावसाळ्यापूर्वी धरणात विनावापर शिल्लक राहतो. यंदा गेल्या पाच वर्षात यंदा पहिल्यांदाच विनावापर शिल्लक पाणीसाठा कमी राहील. अशीच स्थिती राधानगरी व तुळशी धरणाची आहे. या धरणातही दरवर्षी पावसाळ्यापूर्वी एक ते अर्धा टीएमसी पाणीसाठा विनावापर शिल्लक राहतो.
काळम्मावाडी धरणातून गैबी बोगद्याद्वारे भोगावती नदीत दरवर्षी तीन टीएमसी पाणी सोडले जाते. यामुळे राधानगरी व तुळशी धरणातील पाणी वापरावरील ताण कमी झाला आहे. आजघडीला तीनही धरणांतील पाणीसाठा कमी असला तरी केवळ पावसाळ्यापूर्वी या धरणात विनावापर राहणाऱ्या पाणीसाठ्यातील घट वाढणार आहे. यामुळे पाणी कमतरतेची शक्यता मॉन्सून लांबला तरच आहे; अन्यथा अजिबात राहणार नाही.

चौकट
१६ मार्चची स्थिती (टीएमसीत)
धरण*आजची स्थिती*गतवर्षीची स्थिती
राधानगरी*४.४०*४.७३
काळम्मावाडी*९.००*१४.६७
तुळशी*२.०५*२.३८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com